vaccination
vaccination vaccination
देश

लसीकरणाची गती वाढवा, अन्यथा तिसरी लाट अटळ- रिपोर्ट

कार्तिक पुजारी

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. २१ जून रोजी भारताने लसीकरणाचा विक्रम केला

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असताना तिसऱ्या लाटेशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. २१ जून रोजी भारताने लसीकरणाचा विक्रम केला. एकाच दिवशी ८५ लाखांपेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आली. असे असले तरी काही तज्ज्ञांच्या दाव्यानुसार भारतात लसीकरणाची हीच गती कामय राहिली, तर तिसरी लाट रोखता येणार नाही. ब्लुमबर्गने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. (India vaccination not fast enough to stop Corona 3rd wave Bloomberg Report)

२१ जूनपासून लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. तेव्हापासून लसीकरणाची गती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, ब्लुमबर्गला दिलेल्या मुलाखतीत तज्ज्ञांनी दावा केलाय की ही कृत्रिम वाढ आहे. काही राज्यांनी कृत्रिम पद्धतीने ही वाढ केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशोका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर गौतम मेनन म्हणतात की, 'एका दिवसातील विक्रमी वाढ हा काही राज्यांचा एकत्रित प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी लशीचा सर्व साठा वापरला आहे. तिसरी लाट कमी प्रभावी करायची असेल तर दररोज किमान १ कोटी लोकांचे लसीकरण आवश्यक आहे.'

अडचण काय?

तज्ज्ञांनी रिपोर्टमध्ये म्हटलंय की, भारतातील लशीच्या निर्यातीवर बंदी आणली असली तरी आतापर्यंत खूप कमी लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. शिवाय ग्रामीण भागातील लोकांमध्ये अजूनही लशीबाबत साशंकता आहे. लशींच्या उपलब्धतेचा प्रश्वही महत्त्वाचा आहे. भारताने दररोज सरासरी ३२ लाख लोकांना लस दिली तरी वर्षाच्या शेवटी केवळ ४५ टक्के लोकांनाच लस मिळेल आणि ६५ टक्के लोकांना लस मिळण्यास मार्च २०२२ उजाडेल. तसेच लशीची उपलब्धता पुरेशी झाल्यास आणि ३० टक्क्यांनी लशीची गती वाढल्यास वर्षाच्या शेवटी ५५ टक्के लोकांचेच लसीकरण होईल.

हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण आवश्यक आहे. सध्याच्या लसीकरणाचा वेग पाहता तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे देशावर तिसऱ्या कोरोना लाटेचं संकट घोंघावत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लसीकरण आणि नियमांचे पालन या दोन्ही गोष्टी कोरोनाला हरवण्यासाठी आवश्यक आहेत. पण, लोकांनी गर्दी करणे सुरु ठेवल्यास आणि निर्बंध खूपच शिथिल केल्यास तिसरी लाट काही आठवड्यांच्या आतच येण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचे लसीकरण होईल, असं म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT