INDIA vs NDA Esakal
देश

INDIA vs NDA: मोदींना सत्तेतून खेचणार? ही तर लोकांची ईच्छा, योग्य वेळी पाऊले उचलणार; सत्तास्थापनेबाबत खर्गे स्पष्टच बोलले

बैठकीनंतर बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, या निवडणुकीत देशातील जनतेने भाजपच्या द्वेषपूर्ण राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीची खलबतं सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

नवी दिल्लीत नुकतीच इंडिया आघाडीची बैठक पार पडली. यामध्ये लोकसभा निवडणुकीचा कौल सत्ताधारी भाजपच्या विरोधात असल्याचा सूर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी काढला.

बैठकीनंतर बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, या निवडणुकीत देशातील जनतेने भाजपच्या द्वेषपूर्ण राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "आमच्या बैठकीत, घटक पक्षाच्या नेत्यांनी अनेक सूचना आणि मुद्दे मांडले आणि सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यात इंडिया आघाडीने भाजपच्या फॅसिस्ट सरकारविरोधा लढत राहण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर या हुकुमशाही सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची जी जनतेची ईच्छा आहे. ती आम्ही योग्य वेळ येताच पूर्ण करू."

इंडिया आघाडीला दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि भाजपच्या द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल देशातील मतदारांचे मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी आभार मानले.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी नवीन सरकार स्थापनेबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक झाली, तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांचीही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे निवासस्थानी बैठक झाली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, शिवसेना-यूबीटी, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा आणि इतर घटक पक्षांचे नेते खर्गे यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठकही आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी एकमताने पंतप्रधान मोदी यांची एनडीए आघाडीचे नेते म्हणून निवड केली.

एनडीएच्या बैठकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात शिवसेनेने सात तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT