Ramdev-Baba 
देश

भारत-पाक सामना देशहित आणि राष्ट्रधर्माविरुद्ध - रामदेव बाबा

सकाळ डिजिटल टीम

भारत-पाक या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या या सामन्याबाबत वक्तव्य केल्यानं रामदेवबाबा चर्चेत आले आहेत.

वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत-पाक या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या या सामन्याबाबत वक्तव्य केल्यानं रामदेवबाबा चर्चेत आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी २० वर्ल्ड कपमध्ये होणारा सामना हा देशहित आणि राष्ट्र धर्माच्या विरोधात असल्याचं योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, क्रिकेटचा खेळ आणि दहशतवादाचा खेळ एकाच वेळी खेळला जाऊ शकत नाही.

नागपूरमध्ये विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना रामदेवबाबा यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं व्यसन भारताच्या तरुणांसाठी खूपच धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. ज्या पद्धतीने ड्रग्जला ग्लॅमराइज केलं जात आहे आणि ज्यांना लोक आदर्श मानतात तेच यामध्ये सहभागी असल्याचं दिसतं हे जनतेसाठी चुकीचं असल्याचंही ते म्हणाले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान सामना होत आहे. त्याबद्दल विचारलं असता रामदेव बाबा म्हणाले की, मला वाटतं की अशा परिस्थिती क्रिकेट सामना देशहिताचा नाही. तसंच हा राष्ट्रधर्माच्या विरोधात आहे. क्रिकेटचा खेळ आणि दहशतवादाचा खेळ हा एकत्र खेळला जाऊ शकत नाही.

सरकारला आपली अर्थव्यवस्था मजबूत करतानाच राष्ट्र हिताचे सामाजिक उपक्रम सुरू ठेवायचे आहे. सरकार समोर वेगवेगळी आर्थिक आव्हाने आहेत. त्यांना सरकारही चालवायचे आहे. म्हणून सरकार इंधनावरील कर कमी शकत नाही, अशी असेही रामदेव बाबा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Pimpalgaon Joga Canal: पिंपळगाव जोगा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान, जुन्नरमध्ये कालवा फुटीचा थरार..

SCROLL FOR NEXT