Virat Kohli
Virat Kohli Virat Kohli
देश

"तुम्ही भारताचं नाक कापलं; आजच कर्णधार पदाचा राजीनामा द्या"

सुधीर काकडे

T 20 विश्वचषकात आज भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर चाहत्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच अभिनेता कमाल खानने देखील नाराजी व्यक्त केली. आज आपण भारताचं नाक कापलं. आपण आजच भारतीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा असं ट्विट कमाल खानने केलं आहे.

"आज मी 5-6 वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ खेळताना पाहिला. मला माहित नव्हते की, ते इतके चांगले आहे. त्यामुळे जुहू गली संघाशी त्यांची तुलना केल्याबद्दल मला खरोखरच खेद वाटतो. मला कधीच माहित नव्हके की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ICC T20 खेळाडू आहे आणि फक्त 21 वर्षांचा शाहीन आफ्रीदी इतका खतरनाक गोलंदाज आहे. म्हणजेच बाबर हा विराट कोहलीपेक्षा मोठा खेळाडू आहे. अविश्वसनीय!" असं म्हणत कमाल खानने विराटच्या राजीनाम्याची मागणी केली.

कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाने 151 धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवा या दोघांनीच या धावा करत टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभूत केले. मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 79 धावांची खेळी केली.

दुसऱ्या बाजूला कर्णधार बाबर आझम 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 68 धावा करुन नाबाद राहिला. वर्ल्ड कपच्या इतिहासातील पराभवाची मालिका खंडित करत बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने नवा इतिहास रचला. दुबईच्या मैदानात पाकिस्तान संघाने टीम इंडियाला एकहाती पराभूत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT