Vaccines esakal
देश

भारताकडून पुन्हा सुरु होणार विदेशात लस पुरवठा - आरोग्यमंत्री

'वॅक्सीन मैत्री' कार्यक्रमांतर्गत हा लस पुरवठा केला जाणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारताकडून पुन्हा इतर देशांमध्ये लस पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. 'वॅक्सीन मैत्री' कार्यक्रमांतर्गत हा लस पुरवठा केला जाणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून लस निर्मिती कंपन्या विदेशात लस पाठवू शकणार आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये भारतात पुरेसं लसीकरण झालेलं नसल्यानं केंद्रानं विदेशात लस पाठवण्यावर निर्बंध आणले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी स्पष्ट केलं की, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांजवळ जे काही अतिरिक्त लस उपलब्ध असतील या लस 'व्हॅक्सिन मैत्री' कार्यक्रमांतर्गत इतर देशांमध्ये पाठवण्यात येतील. विविध लस कंपन्यांकडून ऑक्टोबरपासून भारतात ३० कोटींहून अधिक लस उपलब्ध होतील, असा दावाही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

भारत कोरोना प्रतिबंधक लसींचा जगातील सर्वात मोठा निर्माता आहे. एप्रिल महिन्यात भारतानं आपल्या जास्तीत जास्त जनतेचं लसीकरण करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी लस निर्यातीवर निर्बंध आणले होते. दरम्यान, डिसेंबरपर्यंत भारत आपल्या सर्व ९४.४ कोटी प्रौढ जनतेला लसीकरण पूर्ण करायचं ध्येय ठेवलं आहे. यांपैकी आत्तापर्यंत ६१ टक्के जनतेला एक डोस देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT