Narayan Rane Case sakal
देश

Narayan Rane: काही वर्षात भारत जर्मनी-जपानला मागे टाकेल; अर्थसंकल्पावर राणेंनी मांडली भूमिका

अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं असून काही वर्षात भारत जर्मनी-जपानला मागे टाकेल, असं विधान राणे यांनी केलं आहे. (India will surpass Germany Japan in a few years Narayan Rane expressed his belief)

राणे म्हणाले, "या अर्थसंकल्पाला मी सर्वंकष अर्थसंकल्प म्हणेन की ज्यामध्ये देशाच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. जागतीक पातळीवर देश तिसऱ्या क्रमांकावर जावा एवढी अर्थव्यवस्था सुधारली जावी, अशी पावलं उचलण्यात आली आहेत. त्यामुळं काही वर्षात भारत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकेल. केंद्राच्या प्रयत्नांमुळं दरडोई उत्पन्न आता ७९ हजारांवरुन १ लाख ९७ हजार रुपये इतकं झालं आहे"

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीसाठी तरतूद केली जाते पण मुंबईसाठी काही तरतूद केलेली नाही, या प्रश्नावर राणे म्हणाले, मुंबईसाठी आम्ही तरतूद करायला लावू, मुंबईसाठी कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे पाहिजे ते आम्ही उपलब्ध करु आणि आमचं ते ऐकतील एवढा मला विश्वास आहे.

मुंबईत आम्ही भाजपची सत्ता आणणार म्हणजे आणणार. कारण शिवसेनेनं मुंबईला लुटलंय पूर्णपणे आता बस्स झालं. मुंबईला यांनी इतकं लुटलं की यु आणि आर नावानं हप्ते जात होते. विदृप करुन टाकली मुंबई, असा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT