tunnel
tunnel esakal
देश

चीनला बसणार मोठा दणका! भारत LAC वर बनणार जगातील लांब बोगदा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत LAC वर बनविण्यात येणाऱ्या या बोगद्याद्वारे भारतीय लष्कराला एलएसीपर्यंत (Line of Actual Control) पोहोचण्यासाठी तसंच आवश्यक वस्तू पोहोचवण्याकरिता ही सोपं जाणार आहे. शिवाय, या बोगद्यामुळे (Tunnel) वेळेचीही बचत होईल. तसेच यामुळे चीनलाही मोठा धक्का बसणार आहे. पूर्व लडाखमध्ये (Eastern Ladakh) लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (LAC) भारत- चीन तणावादरम्यान अरुणाचल (Arunachal Pradesh) प्रदेशमध्ये सेला टनलचं (Sela Tunnel) खोदकाम पूर्ण झालं आहे. हा बोगदा भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारतासाठी खास आहे हा बोगदा...

हा बोगदा सेला खिंडीतून जातो आणि त्याच्या बांधणीनंतर तवांग ते चीन सीमेचे अंतर 10 किमी कमी होण्याची शक्यता आहे. हे अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. या प्रकल्पात दोन बोगदे बांधले जात आहेत. बोगदा 1 सुमारे 980 मीटर लांब आहे, तर बोगदा क्रमांक 2, जो ट्विन टनल बोगदा आहे, त्याची लांबी सुमारे 1555 मीटर आहे.

भारतीय लष्करासाठी उपयुक्त

पूर्व लडाखमध्ये (Eastern Ladakh) लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (LAC) भारत- चीन तणावादरम्यान अरुणाचल (Arunachal Pradesh) प्रदेशमध्ये सेला टनलचं (Sela Tunnel) खोदकाम पूर्ण झालं आहे. गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी याचे उद्घाटन केले. हा बोगदा भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या बोगद्याद्वारे भारतीय लष्कराला सर्व हवामानात एलएसीपर्यंत (Line of Actual Control) पोहोचण्यासाठी तसंच आवश्यक वस्तू पोहोचवण्याकरिता ही सोपं जाईल. शिवाय, या बोगद्यामुळे (Tunnel) वेळेचीही बचत होईल.बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर, 1.5 किमी पेक्षा जास्त लांबीचा हा बोगदा 13,000 फूट उंचीवर जगातील सर्वात लांब डबल लेन रोड बोगद्यांपैकी एक असेल. आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या या बोगद्यावर हिमवर्षावाचाही परिणाम होणार नाही.या बोगद्याच्या बांधणीनंतर, बोमडिला आणि तवांग दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 13 चा 171 किलोमीटरचा हा जो रस्ता असेल, तो सर्व हवामानात उपयोग होईल. ज्यामुळे पर्यटकांसह इतर आवश्यक रहदारीस मदत मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT