Wing Commander Prithvi Singh Chouhan esakal
देश

31 वर्षांनी भाऊ रक्षाबंधनासाठी आलेला; पृथ्वीच्या आठवणीत बहिणीचा टाहो

सकाळ डिजिटल टीम

हेलिकॉप्टर भीषण अपघातात पृथ्वी सिंह चौहान हे देखील शहीद झाले आहेत.

आग्रा : कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह आग्र्याचे रहिवासी विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान (Wing Commander Prithvi Singh Chouhan) हेही उपस्थित होते. या भीषण अपघातात पृथ्वी सिंह चौहान हे देखील शहीद झाले आहेत. शहीद पृथ्वी सिंह चौहान यांच्याबद्दल सांगताना मोठी बहीण मीना सिंह म्हणाली, पृथ्वी तब्बल 31 वर्षांनंतर रक्षाबंधनला (Raksha Bandhan) बहिणींकडून राखी बांधून घेण्यासाठी घरी आला होता. दुपारी हेलिकॉप्टर अपघाताची बातमी कळताच, मीनानं भाऊ पृथ्वीला फोन केला. मात्र, पृथ्वी यांचा फोन बंद होता.

यानंतर वहिनी कामिनी यांच्याशी संपर्क साधला असता, कामिनीनं या भीषण अपघाताची माहिती दिली. त्या म्हणाल्या, पृथ्वी सध्या 42 वर्षांचा आहे आणि तो चार बहिणींमध्ये सर्वात लहान भाऊ आहे. मोठी बहीण शकुंतला, दुसरी मीना, गीता आणि नीता, असं त्यांनी नमूद केलं. पृथ्वी यांनी रीवा येथील सैनिक स्कूलमध्ये सहावीत प्रवेश घेतला. तिथून त्यांची एनडीएमध्ये निवड झाली. 2000 मध्ये ते भारतीय हवाई दलात सामील झाले. सध्या चौहान हे विंग कमांडर होते आणि कोईम्बतूरजवळील एअर फोर्स स्टेशनवर तैनात होते. पृथ्वी यांचा विवाह 2007 मध्ये वृंदावन येथील कामिनीसोबत झाला होता. त्यांची मुलगी आराध्या 12 वर्षांची, तर अविराज नऊ वर्षांचा आहे.

विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान एअर फोर्समध्ये रुजू झाल्यानंतर, पृथ्वीची पहिली पोस्टिंग हैदराबादमध्ये झाली. यानंतर त्यांची गोरखपूर, गुवाहाटी, उधम सिंग नगर, जामनगर, अंदमान आणि निकोबारसह अन्य हवाई दलाच्या स्थानकांवर नियुक्ती करण्यात आली. त्यांना एक वर्षाच्या विशेष प्रशिक्षणासाठी सुदानलाही पाठवण्यात आलं होतं. विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच संपूर्ण शहरात शोककळा पसरलीय. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येनं लोक जमू लागले आहेत. तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र, या अपघातात रावत यांच्या पत्नीचंही निधन झाल्याचं स्पष्ट झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT