Air Force Aeroplane
Air Force Aeroplane Sakal
देश

भारतीय हवाई दल आणतेय ‘संजीवनी’

पीटीआय

नवी दिल्ली - देशात कोरोनाविरुद्धच्या (Corona) लढाईत भारतीय हवाई दल (Air Force) मोलाची भूमिका बजावत आहे. परदेशातून ऑक्सिजन, औषधे, पीपीई किट यासारखे वैद्यकीय साहित्य (Medical Equipment) एअरलिफ्ट (Airlift) करण्याचे काम (Work) हवाई दलाकडून केले जात आहे. हवाई दलाने देशातील कोविड रुग्णांच्या (Covid Patient) मदतकार्यासाठी ४२ मालवाहू विमाने (Aeroplane) तैनात केली आहेत. यात १२ विमाने अधिक वजन वहन करणारे तर ३० विमाने मध्यम वजनाचे साहित्य वहन करणारे आहेत. (Indian Air Force Medical Equipment Airlift Help)

एअर व्हाइस मार्शल मकरंद रानडे म्हणाले की, कोरोनाची तीव्रता वाढल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरू झाला. ही मदत जहाज आणि हवाई मार्गाने येत असून हवाई दलाकडून अहोरात्र सेवा बजावली जात आहे. तब्बल ४२ विमानांच्या मदतीने भारतात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सामग्री आणण्यात आली आहे. या विमानांच्या मदतीने वैद्यकीय साहित्य, कर्मचारी आणि उपकरणांची संबंधित ठिकाणी ने आण केली जात आहे. आतापर्यंत हवाई दलाने ७५ ऑक्सिजन कंटेनर आणले आहेत आणि अजूनही आणण्यात येत आहेत.

देशातील कोरोनाचा हाहा:कार पाहता अमेरिका, इस्राईलसह अनेक देशांनी वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला आहे. हे साहित्य हवाई दलाचे विमान देशातील विविध भागात पोचवण्याचे काम करत आहे. मदतकार्य करताना हवाई दलातील कर्मचारी बाधित होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.

९८ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण

कोरोना संसर्गाचा धोका कमी राहवा यासाठी हवाई दलातील ९८ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. त्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच सुमारे ९० टक्के कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला आहे. शंभर टक्के लसीकरणाच्या दृष्टीने आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत, असे एअर व्हाइस मार्शल रानडे यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुहेरी प्रभाव असल्याचे सांगत ते म्हणाले, पहिला म्हणजे शारीरिक आणि याचा अर्थ आम्ही सज्ज राहणे आणि दुसरे म्हणजे मानसिकदृष्ट्या खंबीर असणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT