Indian Army Day Team eSakal
देश

Video : रणगाडे, हेलिकॉप्टर, ड्रोन, मशिन गन्स; अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिकं

Indian Army Day निमित्त सैन्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सुधीर काकडे

15 जानेवारी हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी भारतीय सैन्य दिन (Indian Army Day) म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारताचा 74 वा सैन्य दिन यंदा साजरा होत आहे. या निमित्ताने भारतीय सैन्याने एक व्हिडीओ शेअर करत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

का साजरा केला जातो सैन्य दिन...

फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सैन्यातील योगदानासाठी 15 जानेवारीला सैन्य दिन साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटीश कमांडरच्या ताब्यात लष्कर होते. सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय लष्कराचे अध्यक्ष ब्रिटिश वंशाचे होते. 1949 मध्ये, स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांनी घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते आणि त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. पुढे करिअप्पाही फील्ड मार्शल बनले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

Mumbai News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा बांधकाम, महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रकार; प्रशासनाचे तत्काळ कारवाईचे आदेश

गोविंदाची तब्येत बिघडली? चेहऱ्यावर मास्क, पडलेला चेहरा अन्.... सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Gen Z आणि Gen Alpha तरुणांशी संवाद साधला

Khed Shivapur Road Block: खेड-शिवापूर येथील रस्ता रोकोचा फटका; नायगावमध्ये वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा

SCROLL FOR NEXT