Indian Army Soldier Kidnapped: भारतीय लष्करातील जवान एकाएकी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ईद निमित्त आपल्या घरी गेलेल्या जवानाचं अपहरण झाल्याची माहिती आहे. जावेद अहमद वाणी असं या जवानाचं नाव आहे. शनिवारी रात्रीपासून जावेद बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
ज्या गाडीतून संबंधित जवान घरून निघाले होते ती गाडीही नातेवाईकांना मिळाली आहे. यासंबधीचे शोधकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय जावेद अहमद वानी हा भारतीय लष्कराचा शिपाई लेहमध्ये तैनात आहेत. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ते बेपत्ता झाला. याचबरोबर सायंकाळी परन्हाळ येथे त्यांची कार सापडली आहे. कुलगाममधील अचथल भागातील तो रहिवासी आहेत.
अपहरणाची माहिती मिळताच लष्कराने जवानाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानी घरासाठी किराणा सामान घेण्यासाठी कार चालवून चौलगामला गेला होता.
रात्री उशिरापर्यंत तो न परतल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूच्या गावात त्याचा शोध सुरू केला. यादरम्यान त्यांची कार परनाळजवळ आढळून आली. गाडीला कुलूप नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. कारमध्ये वाणीची चप्पल आणि रक्ताच्या खुणाही आढळून आल्याने नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.