Indian Army Viral Video eSakal
देश

Indian Army Viral Video : ना कशाची तक्रार, ना तमा.. कोरडी चपाती असूनही हसत-खेळत जेवतायत भारतमातेचे जवान; पाहा व्हिडिओ

Army Lunch Video : हा व्हिडिओ नेटिझन्सना भरपूर पसंत पडत आहे.

Sudesh

Indian Army Video : देशाच्या सुरक्षेसाठी भारतमातेचे जवान हे सीमेवर 24 तास तैनात असतात. बर्फाळ डोंगरांवर त्यांना कितीतरी आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मात्र, डोळ्याची पापणीही लवू न देता ते देशाची रक्षा करत राहतात.

देशाच्या जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये काही जवान दुपारचं जेवण करत आहेत. त्यांच्याकडे असणारी चपाती एवढी कोरडी झाली आहे, की ती तोडण्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र, कोणतीही तक्रार न करता ते अगदी हसत-खेळत जेवण करत आहेत.

आरव्हीसीजे मीडिया या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये एक जवान मजेत म्हणत आहे, की ही चपाती तोडण्यासाठी करवत मिळेल का? त्यावर दुसरा जवान उत्तर देतो, की 'आज बाकी दिवसांच्या तुलनेत मऊ चपाती बनवली आहे' यावर सगळे हसू लागतात, आणि आपलं जेवण सुरू ठेवतात.

एकीकडे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तक्रार करणारे आपण सगळे, आणि तिकडे सीमेवर प्रतिकूल परिस्थितीमध्येही हसत-खेळत जेवण करणारे जवान असा फरक स्पष्ट दाखवणारा हा व्हिडिओ नेटिझन्सना भरपूर पसंत पडत आहे. 'भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम', 'यावर विश्वास बसत नाही', 'हे आपले खरे हीरो आहेत' अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडिओला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT