Gujrat Esakal
देश

गुजरातमध्ये तब्बल 425 कोटींचं ड्रग्स जप्त; एटीएस, कोस्टगार्डची संयुक्त कारवाई

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखाच्या समुद्रकिनाऱ्यावर एटीएस आणि कोस्टगार्डने संयुक्त कारवाई केली

सकाळ डिजिटल टीम

गुजरातच्या समुद्राजवळ एक इराणहून आलेली बोट पकडण्यात आली आहे. या बोटीमध्ये तब्बल 425 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. ऐन होळीच्या तोंड्यावर एटीएस आणि कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एटीएस आणि कोस्टगार्डने ही संयुक्त कारवाई केली आहे. इराणहून आलेली एक संशयास्पद बोट एटीएस आणि कोस्टगार्डने पकडली आहे. या बोटीची तपासणी केली असता त्यामध्ये 425 कोटी किंमतीचे 61 किलो हेरॉइन आढळून आले आहे. या बोटीतून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबऱ्याने मिळालेल्या माहितीनुसार शहरात मोठ्या प्रमाणात हेरॉइन येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली आहे.

ओखा समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल 340 किलोमीटर दूर अंतरावर एक संशयित बोट आढळून आली. गस्तीवर असलेल्या कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी बोटीला थांबण्याची सूचना केली. पण, तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करून या बोटीला पकडण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT