Former US President Barack Obama esakal
देश

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बेळगावला येणार? काँग्रेसला मिळणार जागतिक स्तरावर प्रसिद्धी, काय आहे कारण?

Indian Congress General Conference : बेळगावात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस (Congress) पक्षाच्या महाअधिवेशनाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बेळगावात २६ डिसेंबर १९२४ रोजी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ३९ वे राष्‍ट्रीय अधिवेशन पार पडले होते.

बेळगाव : बेळगावात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस (Congress) पक्षाच्या महाअधिवेशनाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शताब्दी महोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांना आमंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. याबाबत राज्याचे कायदा व संसदीय खात्याचे मंत्री एच. के. पाटील यांनी बंगळूर येथील एका कार्यक्रमात सूतोवाच केले आहे.

डिसेंबरमध्ये अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे. बराक ओबामा यांनी महात्मा गांधींबाबत बोलताना, गांधीजी हे केवळ भारताचे नसून गांधीजी हे जागतिक स्तरावरील नेते असल्याचे अनेकदा सांगितले आहे. यामुळे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीद्वारे (Karnataka Pradesh Congress Committee) बेळगावात आयोजित करण्यात येणाऱ्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमास ओबामा यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मंत्री के. एच. पाटील यांनी सांगितले आहे.

बेळगावात २६ डिसेंबर १९२४ रोजी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ३९ वे राष्‍ट्रीय अधिवेशन पार पडले होते. येथे झालेल्या या अधिवेशनावेळी तत्कालीन राष्ट्रीय स्तरावरचे नेते या ठिकाणी आले होते. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेले हे काँग्रेसचे पहिले आणि अखेरचे अधिवेशन ठरले होते. या ऐतिहासिक घटनेला २६ डिसेंबर २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत.

काँग्रेस अधिवेशनाचा हा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बराक ओबामा यांचा बेळगाव दौऱ्याचा कार्यक्रम निश्र्चित झाल्यास या अधिवेशनाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळणार आहे. तसेच बेळगावचे नावही जागतिक स्तरावर चमकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT