CRPF Dogs eSakal
देश

CRPF Dogs : पोलिस दलांच्या दिमतीस लवकरच देशी श्वान! ‘रामपूर हाउंड’, ‘हिमाचली शेफर्ड’, ‘बकरवाल’ होणार तैनात

केंद्रीय पोलिस दलांमध्ये परकी जातीच्या श्वानांचा वापर केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

‘हिमालयन माउंटेन कॅनिन’, ‘रामपूर हाउंड’, ‘हिमाचली शेफर्ड’, ‘गड्डी’, ‘बकरवाल’ तसेच ‘तिबेटियन मस्टिफ’ आदी भारतीय जातीच्या श्वानांचा लवकरच केंद्रीय पोलिस दलांमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. संशयितांचा माग काढणे, अमली पदार्थ तसेच स्फोटकांचा शोध घेणे, धोकादायक क्षेत्रातील पेट्रोलिंग अशा कामांसाठी या श्वानांचा वापर केला जाऊ शकतो.

‘सीमा सुरक्षा दल’ (एसएसबी), ‘केंद्रीय राखीव पोलिस दल’ (सीआरपीएफ), ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’मध्ये (सीआयएसफ)या श्वानांचा समावेश करण्यात येईल. विविध सुरक्षा दलांमध्ये ‘रामपूर हाउंड’च्या समावेशाची प्रक्रिया सुरू असून, ‘हिमालयन कॅनिन’ जातीच्या श्वानांची चाचणी घेतली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्रीय पोलिस दलांमध्ये परकी जातीच्या श्वानांचा वापर केला जातो. यात ‘जर्मन शेफर्ड’, ‘लॅब्रेडॉर’, बेल्जियन मॅलिनोईस’ आणि ‘कॉकर स्पॅनिल’ यांचा समावेश आहे. विविध सुरक्षा दलांकडून सध्या कार्यरत असलेल्या श्वानांची कामगिरी तपासली जात आहे. ज्यांची कामगिरी समाधानकारक नसेल त्यांची जागा हे देशी श्वान घेतील.

चाचण्यांना वेग

‘मुधोळ हाउंड’ या प्रजातीच्या देशी श्वानांचा सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि भारत तिबेट पोलिस दलात (आयटीबीपी) याआधीच समावेश करण्यात आला आहे. ‘रामपूर हाउंड’च्या ‘सीआरपीएफ’ आणि ‘बीएसएफ’कडून चाचण्या घेतल्या जात असल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. ‘हिमालयन माउंटेन डॉग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिमाचली शेफर्ड’, ‘गड्डी’, ‘बकरवाल’ आणि ‘तिबेटियन मस्टिफ’ यांच्याही चाचण्या घेतल्या जात आहेत.

मोदींनी केला होता उल्लेख

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक देशी श्वानांच्या प्रजातींना प्रोत्साहन देण्याचा मानस जाहीर केला होता. हे सर्व श्वान ‘पोलिस सर्व्हिस के-९ स्क्वाड’चा घटक असतील. हेच स्क्वाड विविध श्वानांना प्रशिक्षण देते आणि नंतर त्यांचा समावेश ‘बीएसएफ’, ‘सीआरपीएफ’, ‘सीआयएसफ’, ‘आयटीबीपी’, ‘एसएसबी’, ‘एनएसजी’ आणि ‘आसाम रायफल्स’मध्ये करण्यात येतो.

‘के-९’ स्क्वाडवर मोठी जबाबदारी

‘के-९’ स्क्वाडची स्थापना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २०१९ मध्ये पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाचा उपक्रम हाती घेतला होता त्या अन्वयेच या ‘स्क्वाड’ची स्थापना करण्यात आली आहे. देशी श्वानाच्या प्रजोत्पादनास प्रोत्साहन देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि उत्तम दर्जाच्या श्वानांची निवड करणे आदी जबाबदाऱ्या या ‘स्क्वाड’वर आहेत.

श्वान सामर्थ्य

  • तैनात श्वान - ४,०००

  • एनएसजी - १००

  • ‘सीआयएसएफ’ - ७००

  • ‘सीआरपीएफ’ - १,५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT