देश

स्पुटनिक लाईट लांबणीवर! तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस DCGIने नाकारली मंजूरी

विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी सध्या लस हेच एक प्रभावी शस्त्र उपलब्ध आहे. देशात सध्या चार लशींच्या आपत्कालीन वापराला मंजूरी मिळाली असून इतरही अनेक लशी सध्या स्पर्धेत आहेत. रशियाची सिंगल डोस लस 'स्पुटनिक लाईट' ही देखील या स्पर्धेत आहे. मात्र, ही लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता सध्या मावळली आहे. रशियाच्या या स्पुटनिक लाईट लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजूरी मिळालेली नाहीये. डॉ. रेड्डीज लॅब या लशीच्या चाचण्या भारतात घडवून आणत आहे. आज गुरुवारी सूत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे.

सूत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय औषध नियामक संस्थेने डॉ. रेड्डीज लॅबला भारतामध्ये स्पुटनिक लाईटच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. सध्या भारतामध्ये स्पुटनिक-व्ही लस उपलब्ध आहे.

असं म्हटलं जातंय की, जर स्पुटनिक लाईट लशीच्या चाचणीसाठी मंजूरी मिळाली असती आणि त्यानंतर या लशीच्या वापरास देखील परवानगी मिळाली असती तर भारतात उपलब्ध होणारी ही पहिलीच सिंगल डोस व्हॅक्सीन ठरली असती. मात्र, या लशीच्या चाचण्यांसाठीची परवानगी नेमक्या कोणत्या कारणास्तव नाकारण्यात आली आहे, याबाबतची माहिती सध्या उपलब्ध नाहीये. स्पुटनिक लाईट लशीला रशियात मंजूरी प्राप्त झाली आहे. तसेच या लशीचे दुसऱ्या देशात देखील चाचण्या सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: बालिंगा कचरा डेपोला आग; धुरामुळे ग्रामस्थ हैराण!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

SCROLL FOR NEXT