Uniform Civil Code Sakal
देश

Uniform Civil Code: समान नागरी कायदा बनवण्यासाठी मोदींचे मोठे पाऊल, या ४ मंत्र्यांची समिती स्थापन

UCC:समान नागरी संहितेवर भारत सरकारने मंत्र्यांचा एक गट स्थापन केला आहे. वरीष्ठ मंत्र्यांना या अनौपचारिक गटात स्थान देण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Government on UCC:समान नागरी संहितेवर भारत सरकारने मंत्र्यांचा एक गट स्थापन केला आहे. वरीष्ठ मंत्र्यांना या अनौपचारिक गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात स्मृती इराणी, जी किशन रेड्डी आणि अर्जुन राम मेघवाल हे सदस्य असून, या गटाचे अध्यक्षपद किरण रिजीजू यांच्याकडे देण्यात आले आहे. या मंत्र्यांची बुधवारी (दि.५ जुलै) बैठक देखील झाली होती.

मंत्र्यांना देण्यात आली वेगवेगळी जबाबदारी

स्थापन करण्यात आलेल्या गटातील मंत्री समान नागरी संहितेशी निगडीत वेगवेगळ्या बाबींवर सल्लामसलत करतील. आदिवासींशी निगडीत मुद्द्यांवर किरण रिजीजू, महिलांच्या अधिकारांशी निगडीत मुद्द्यांवर स्मृती इराणी, पूर्वोत्तर राज्यांशी निगडीत बाबींवर जी किशन रेड्डी आणि कायदेशीर बाबींवर कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल विचार करतील. या मंत्र्याची पूर्वोत्तर राज्यांतील मुख्यमंत्र्याशी याबाबतीत चर्चा झाली आहे.

केंद्र सरकारचा समान नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने हे पहिले महत्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना समान नागरी संहितेबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने याबाबतीत पाऊल पुढे टाकले आहे. यामधील काही मंत्र्याची भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी देखील भेट झाली होती.

पंतप्रधानांनी भोपाळमध्ये काढला समान नागरी संहितेचा मुद्दा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्येप्रदेशच्या भोपाळमध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांना संबोधले. त्यादरम्यान त्यांनी समान नागरी संहितेबद्दल मोठे विधान केले. त्यावेळी ते म्हणाले होते की भारतीय मुस्लिमांना ही गोष्ट समजून घ्यायला हवी की कोणते राजकीय पक्ष हे करत आहेत.

पुढे मोदी म्हणाले की, एका घरात एका सदस्यासाठी एक कायदा असेल आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा, तर घर चालेल का? तर अशा दुहेरी व्यवस्थेने देश कसा चालेल? हे लोक आमच्यावर आरोप लावतात. जर हे लोक मुस्लिमांचे खरे हितचिंतक असते, तर मुस्लिम मागे राहीले नसते. सुप्रिम कोर्ट वारंवार सांगत आहे की समान नागरी संहिता लागू करा, पण मतांच्या भुकेल्या लोकांना असे करण्याची इच्छा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT