Huawei 
देश

चीनच्या Huawei कंपनीला भारत सरकार दणका देण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली:- भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सध्या राजकीय तणाव आहे. पण तरीदेखील स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत भारत सरकार आग्रही आहे. त्यामुळे चीनच्या हुवैई कंपनीबाबत भारत सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सरकारमधील दोन अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकार चीनच्या एका कंपनीला दणका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. चिनी कंपनी असलेल्या हुवैई (Huawei) वर भारतात बंदी घालण्याबाबत जून महिन्यापर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. हुवैई कंपनीने बनवलेल्या दूरसंचार उपकरणांना मोबाईल कॅरियर पुरवण्यापासून भारतात अडथळा आणण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली. भारतातील मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांची व्यवसाय वाढवण्याची इच्छा आणि भारतीयांची सुरक्षा या मुद्द्यांमुळे हुवैई कंपनीच्या उपकरणांवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हुवैई कंपनीला स्वत:च्याच देशात बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर लडाखच्या सीमेवर भारत-चीन यांच्यात वाढलेला तणाव पाहता आता भारतातदेखील हुवैई कंपनीच्या उपकरणांवर बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, १५ जूननंतर भारतातील मोबाईल कॅरियर असणाऱ्या कंपन्या केवळ भारत सरकारने मान्यता दिलेल्या कंपनींकडूनच मोबाईल विकत घेऊ शकणार आहेत. इतकेच नव्हे तर सरकारकडून ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या कंपन्यांचीही यादी जाहीर करण्यात येणार आहे. या ब्लॅकलिस्टेड कंपन्यांच्या यादीत हुवैईचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे अशी माहिती भारत सरकारच्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. भारतात एखादी कंपनी गुंतवणूक करत असतानाचा भारतीयांच्या सुरक्षेला धक्का लागत असेल तर अशा परिस्थितीत आर्थिक फायदा-तोटा न पाहता जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल, असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील मोठ्या तीन सर्व्हिस प्रोव्हायडरपैकी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया या दोन कंपनी हुवैईचे गियर वापरतात. हुवैईशिवाय आणखी एका चिनी कंपनीच्या उपकरणांवरही बंदी घालण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती तिसऱ्या अधिकाऱ्याने दिली. चिनी कंपनी ZTE कॉर्प या कंपनीलादेखील भारतात बंदी घालण्यात येऊ शकते असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. या दोन्ही कंपन्यांची उपकरणे चिनी सरकारला भारतीय युझर्सची माहिती पुरवतात असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या दोन कंपन्यांना दणका देण्याची तयारी भारत सरकारकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT