Ukraine Russia War Indian Medical Student Refused To Leave Ukraine e sakal
देश

''मी जिवंत असेन किंवा मरेन, पण...'' भारतीय विद्यार्थीनीचा युक्रेन सोडण्यास नकार

सकाळ डिजिटल टीम

रशियाने हल्ला केल्याने युक्रेनमध्ये अतिशय चिंताजनक स्थिती आहे. या युद्धात (Ukraine Russia War) भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. काही जणांना भारतात आणले, तर काही जण अद्यापही परतीची वाट पाहत आहेत. सरकार विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. पण, एका भारतीय विद्यार्थिनीने युक्रेन सोडण्यास नकार दिला आहे. तिनं माणुसकी जपत संधी मिळूनही भारतात परतण्यास नकार दिला. (Indian Medical Student Refused To Leave Ukraine)

भारतीय विद्यार्थीनी ही हरियाणातील रहिवासी असून सध्या युक्रेनमध्ये एका घरात भाड्याने राहतेय. तिच्या घरमालकाने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी युक्रेनियन सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. आता या भारताच्या कन्येने आपल्या घरमालकाच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी उचलली आहे. मी कदाचित जीवंत राहील किंवा माझा जीवही जाऊ शकतो. पण या मुलांना आणि त्यांच्या आईला अशा स्थितीत सोडणार नाही, असं तिनं तिच्या आईला सांगितल्याचं हरियाणातील एका शिक्षिकेने सांगितलंय. द ट्रिब्युन या वेबसाईटनं हे वृत्त दिलंय.

कुटुंबासह बंकरमध्ये लपलीय नेहा -

नेहाचे वडील भारतीय सैन्यात होते. पण, दोन वर्षांपूर्वी वडिलांना गमावले. गेल्या वर्षी नेहाला युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. नेहा घरमालकाची पत्नी आणि तीन मुलांसह एक बंकरमध्ये लपून बसली आहे. ट्रिब्यून या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ''नेहाने आईसोबत बोलताना सांगितले, आम्हाला बाहेर सतत स्फोटांचे आवाज येत आहेत. पण आतापर्यंत आम्ही ठीक आहोत.''

रोमानियाला जाण्याची संधी मिळाली पण... -

नेहा एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी कीव येथे गेली. वसतिगृहाची सोय नसल्याने त्यांनी एका अभियंत्याच्या घरात भाड्याने खोली घेतली होती. नेहाच्या आईची मैत्रिण सविता जाखर यांनी फेसबुक पोस्ट लिहून ही माहिती दिली. नेहा घरमालकाच्या मुलांमध्ये मिसळली. देशातील वाढता तणाव पाहता त्यांना देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. नेहाच्या आईने तिला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर नेहाला युक्रेनमधून रोमानियाला येण्याची संधी मिळाली. पण तिने नकार दिला आणि अशा तणावपूर्ण परिस्थितीत कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला, असं सविता यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT