Indian Navy 
देश

Indian Navy: समुद्रात भरकटले ३६ जण असलेले तीन जहाज, भारतीय नौदल आले मदतीला धावून

Sandip Kapde

Indian Navy :  बंगालच्या उपसागरात तामिळनाडू किनाऱ्यापासून १३० नॉटिकल मैल अंतरावर ३ मासेमारी जहाज अडकले होते.  भारतीय नौदल जहाज खंजरने या जहाजांवरील ३६ भारतीय मच्छिमारांना सुखरूप परत आणले.

खराब हवामान, इंधन, तरतुदी आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना २८ जुलै रोजी चेन्नई बंदरात परत आणण्यात आले, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारचे संशोधन जहाज समुद्रात भरकटले होते. भारतीय तटरक्षक दलाच्या समयसूचकतेमुळे जहाज दुर्घटना होण्यापासून वाचविण्यात यश आले.

एनआयओच्या संशोधन मोहिमेवर असलेल्या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. हे जहाज कारवारजवळ धोकादायकपणे वाहून जात होते. ते खडकाळ भागाला धडकण्यापासून वाचविण्यात तटरक्षक दलाल यश आले. (latest marathi news)

बोर्ड आर. व्ही. सिंधू साधना नामक जहाज ०३ नॉट्स वेगात व्ह्यू इंजिन बंद पडलेल्या स्थितीत सापडले. जेव्हा जहाजाचा डिस्ट्रेस सिग्नल मिळाला तेव्हा ते जमिनीपासून अंदाजे २० नॉटिकल मैल दूर होते. या जहाजामध्ये आठ प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ शास्त्रज्ञ आणि एकूण ३६ कर्मचारी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT