Indian Navy Response to the Hijacking Attempt MV Lila Norfolk marine commandos rescues 21 crew members  
देश

Indian Navy : नौदलाच्या मुख्यालयात अधिकारी पाहत होते लाईव्ह ऑपरेशन; मार्कोस कमांडोनी 'असं' सोडवलं अपहरण झालेलं जहाज

भारतीय नौदलाने कमांडो मार्कोसच्या मदतीने अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ हायजॅक झालेलं कार्गो जहाज 'एमव्ही लीली नॉरफॉक' मधून १५ भारतीयांसह सर्व २१ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवलं.

रोहित कणसे

भारतीय नौदलाने कमांडो मार्कोसच्या मदतीने अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ हायजॅक झालेलं कार्गो जहाज 'एमव्ही लीली नॉरफॉक' मधून १५ भारतीयांसह सर्व २१ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवलं. या जहाजाचे पाच हत्यारबंद लोकांनी अपहरण केले होते.

एडनच्या आखातात झालेल्या या ऑपरेशनचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय नौदलाचे मरीन कमांडो या ऑपरेशनसाठी मालवाहू जहाजावर जाताना दिसत आहेत. समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी संस्था UKMTO ने भारताला जहाज अपहरण झाल्याची माहिती दिली होती. क्रू मेंबर्सकडून पाठवण्यात आलेल्या संदेशात जहाजावर पाच ते सहा हत्यारबंद लोक चढल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर भारतीय नौदलाने तत्काळ कारवाई केली. आयएनएस चेन्नई ला सोमालियाजवळ अडकलेल्या जहाजाच्या सुरक्षेसाठी पाठवले होते.

सुरूवातीला भारतीय नौदलाने मॅरिटाइम पॅट्रोलिंग एअरक्राफ्ट P8Iला जहाजाकडे पाठवले होते आणि त्यानंतर मर्चंट व्हेसलच्या सुरक्षेसाठी आयएनएसला देखील पाठवण्यात आले. भारतीय नौदलाने अपहरण करणाऱ्या चाच्यांना कडक चेतावणी दिली होती. त्यानंतर कमांडो पोहचताच ते जहाज सोडून पळून गेले.

मार्कोस कमांडोच्या या बचाव मोहिमेवर नौदल लाइव्ह फीडद्वारे लक्ष ठेवून होते. भारतीय नौदलाचे अधिकारी दलाच्या MQ-9B प्रीडेटर ड्रोनने पाठवलेल्या फीडचा वापर करून नौदल मुख्यालयात लाईव्ह ऑपरेशन पाहत होते. चाचेगिरीच्या घटनेची माहिती मिळताच ड्रोनला जहाजावर लक्ष ठेवण्याच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना रियल टाइम माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हे जहाज ब्राझीलच्या पोर्टो डू एकू पासून बहरीनच्या खलीफा बिन सलमान पोर्टकडे जात होतं. १७ हजार किमी अंतर गेल्यानंतर हे जहाज ११ जानेवारी बहरीन पोहचणार होतं, पण ४ जानेवारी सोमालियन चाच्यांनी हे हायजॅक केलं. भारतीय सेनेच्या ऑपरेशननंतर चाचे पळून गेले आणि २१ क्रू मेंबर्सना सुखरुप सोडवण्यात आले.

तुम्हाला सांगतो की, अरबी आणि लाल समुद्रात आजकाल व्यापारी जहाजांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी १४ डिसेंबर रोजी चाच्यांनी माल्ट येथून एका जहाजाचे अपहरण केले होते.नंतर नौदलाने आपली एक युद्धनौका एडनच्या खाडीत अपहृत जहाज एमव्ही रौनच्या मदतीसाठी पाठवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT