Indian Navy Day Show eSakal
देश

Indian Navy Day : भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची झलक! इंडियन नेव्हीने शेअर केले खास व्हिडिओ

Indian Navy Video : या व्हिडिओमध्ये भारतीय नौदलाकडे सध्या असणाऱ्या युद्धनौका, हत्यारे, हेलिकॉप्टर आणि जहाजं दाखवण्यात आली आहेत.

Sudesh

तीन बाजूंनी समुद्रकिनारा लाभलेल्या आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय नौदलाचा वाटा अनन्यसाधारण आहे. आज भारतीय नौदल दिनानिमित्त इंडियन नेव्हीने काही खास व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये भारतीय नौदलाची ताकद दिसून येत आहे.

या व्हिडिओच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. शिवरायांचे आरमार हेच भारतीय नौदलाची सुरुवात मानली जाते. यानंतर या व्हिडिओमध्ये भारतीय नौदलाकडे सध्या असणाऱ्या युद्धनौका, हत्यारे, हेलिकॉप्टर आणि जहाजं दाखवण्यात आली आहेत.

इंडियन नेव्हीच्या शौर्याला सलाम करण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणमध्ये असणार आहेत. याठिकाणी नौदलाच्या युद्धनौका, पाणबुड्या, विमानं आणि इतर गोष्टींचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.

भारताच्या नौदलाने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन आणखी काही व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. या व्हिडिओंमधून नौदलाचा इतिहास, महत्त्व आणि सामर्थ्य यांची झलक आपल्याला पहायला मिळत आहे.

आज सायंकाळी मालवणमध्ये होणारा नौदलाचा प्रात्यक्षिक सोहळा पाहण्यासाठी तुम्ही भारतीय नेव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता. सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी लाईव्ह टेलिकास्ट सुरू होईल, अशी माहिती नेव्हीने एका पोस्टमध्ये दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT