देश

आता दर्यावरही ‘तिचे’ राज्य

महत्त्वाच्या युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बंदूक हाती घेऊन देशाच्या सीमांचे संरक्षण करणारी ‘ती’ आता युद्धनौकांवर देखील आपल्या शौर्याचे कसब दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय नौदलाच्या अनेक मोठ्या युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी केली आहे.

नौदलाच्या पंधरा मोठ्या युद्धनौकांवर २८ महिला अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले असून ही संख्या आणखी वाढत जाणार आहे. येथे पत्रकार परिषदेत बोलताना हरीकुमार म्हणाले की,‘‘ महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यास नौदल सज्ज आहे. भारत सरकारप्रमाणेच नौदलाचे ध्येय देखील महिलांचे सक्षमीकरण करणे हे आहे. महिलांना अतिरिक्त संधी मिळावी म्हणून आम्ही विविध उपाययोजना आखल्या आहेत. आता जवळपास सर्व मोठ्या युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.’’ नौदलातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागामध्ये पुढील वर्षी जून महिन्यापासून महिला अधिकाऱ्यांची भरती करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. विनाशिका, गायडेड क्षेपणास्त्रांना नेस्तनाबूत करणारी यंत्रणा आणि टॅंकर यांचे नेतृत्व महिला अधिकारी करतील.

‘विक्रांत’वरही ‘तिचे’ पाऊल

पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ वर देखील महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. तब्बल चाळीस हजार टन एवढे या युद्धनौकेचे वजन असून तिच्या बांधणीसाठी २३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्येच युद्धनौकांवरील विमानांचे उड्डाण हाताळण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

"राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) कॅडेट म्हणूनच प्रवेश केल्यानंतर महिला उमेदवारांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल त्यासाठी प्राथमिक तत्त्वे निश्चित करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू आहेत."

-ॲडमिरल आर. हरीकुमार, नौदलाचे प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT