Passports For Travel sakal
देश

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

Indian passport strength rises: जाणून घ्या, हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या रिपोर्टनुसार भारतीय पासपोर्टचा कितवा आहे क्रमांक?

Mayur Ratnaparkhe

Indian Passport Ranking improves : भारतीय पासपोर्टची ताकद आता जागतिक स्तरावर वाढली आहे. कारण, हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या रिपोर्टनुसार, भारतीय पासपोर्टने जागतिक स्तरावर लक्षणीय झेप घेतली आहे. भारत आता १० स्थानांनी वर चढून ७५ व्या स्थानावर पोहोचला आहे.

याचा अर्थ असा की भारतीयांसाठी जगभर प्रवास करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. विशेष म्हणजे अनेक देशांमध्ये भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसासाठी अनेक दिवस आधी वाट देखील पाहावी लागणार नाही.

या नवीन पासपोर्ट रँकिंगचा सर्वात मोठा फायदा भारतीय प्रवाशांना होणार आहे.  कारण आता ५६ देशांमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता येणार आहे. या देशांमध्ये एकतर व्हिसाची आवश्यकता राहणार नाही, किंवा आगमनानंतर व्हिसा-ऑन-अरायव्हल आणि ई-व्हिसा देखील मिळू शकेल.

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स हे जगभरातील देशांच्या पासपोर्टचे एकप्रकारे मूल्यांकन करते आणि ते सर्वात विश्वासार्ह मानले जाते. हा निर्देशांक आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) डेटाचा वापर करून एखाद्या देशातील नागरिक आंतरराष्ट्रीय स्तरावर किती सहजतेने प्रवास करू शकतात हे ठरवतो. रँकिंग जितके चांगले असेल तितके नागरिकांसाठी प्रवेश स्वातंत्र्य जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT