Indian Railway Employees to get over Rs 17 000 bonus ahead of festive season
Indian Railway Employees to get over Rs 17 000 bonus ahead of festive season 
देश

खुशखबर ! रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार 'इतका' बोनस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त बोनस देण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 17 हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वेतील 11 लाख 91 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा 'गोड' होणार आहे. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेल्वेच्या विनाराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळेल. यासाठी 2,044.31 कोटी रुपयांचा समावेश असणार आहे.  रेल्वेतील या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार असून, या बोनसची रक्कम 17, 951 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेचे अधिकारी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, 'ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशन जनरल सेक्रेटरी' शिव गोपाळ मिश्रा यांनी सांगितले, की 78 दिवसांचा बोनस पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना हा बोनस सणासुदीदरम्यान देण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT