Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

Aditya Roy Kapur And Ananya Panday: अनन्या आणि आदित्यच्या जवळच्या मित्रानं त्यांच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे.
Aditya Roy Kapur Ananya Panday
Aditya Roy Kapur Ananya Pandayesakal

Aditya Roy Kapur And Ananya Panday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हे बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स म्हणून ओळखले जात होते. आदित्य आणि अनन्याला अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. या दोघांच्या सिक्रेट ट्रीप्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच कॉफी विथ करण या शोमध्ये आदित्य रॉय कपूरबद्दल अनन्यानं बरंच काही बोलली. या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु असतानाच आता त्यांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली आहे. अनन्या आणि आदित्यच्या जवळच्या मित्रानं त्यांच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे.

जवळच्या मित्रानं दिली माहिती

टाईम्स ऑफ इंडियाला आदित्य आणि अनन्याच्या मित्राने सांगितलं की, "जवळपास एक महिन्यापूर्वी अनन्या आणि आदित्यचं ब्रेकअप झालं आहे. त्यांच्या ब्रेकअपमुळे आम्हा सर्वांना धक्का बसला. अनन्या या रिलेशनशिपमधून मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करत आहे. मूव्ह ऑन करण्यासाठी, ती तिच्या मित्रांसोबत वेळ घालवत आहे."

Aditya Roy Kapur Ananya Panday
Aditya Roy Kapur:'अभिनेत्यावर ही वेळ का यावी..',आदित्यचा हॉटेलमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते हैराण

अनन्यानं शेअर केली होती पोस्ट

गेल्या महिन्यात, अनन्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती त्यानंतर आदित्यसोबतच्या तिच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली, इंस्टाग्राम स्टोरीवर तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलेले होते, "जे खरोखर तुमच्यासाठी असेल, तर ते तुमच्याकडे परत येईल, ते फक्त तुम्हाला धडे शिकवण्यासाठी सोडतात,जाईल जे तुम्ही स्वतः शिकू शकता. जर ते खरोखरच तुमच्यासाठी असतील तर तुम्ही त्यांना दूर ढकलले असले तरीही ते परत येतील. "

Aditya Roy Kapur Ananya Panday
Aditya Roy Kapoor-Ananya : तो 'हो' म्हणाला, मी 'नाही' का म्हणू?

अनन्या आणि आदित्यचे फोटो झाले व्हायरल

गेल्या वर्षी, आदित्य आणि अनन्याचे  पोर्तुगालमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच अनन्या आणि आदित्य अनेकदा मुंबईत एकत्र दिसले. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या एका एपिसोडमध्ये अनन्याने स्वत:ला अनन्या 'कॉय कपूर' , असे संबोधले होतो. आता आदित्य आणि अनन्या यांच्या जवळच्या मित्रानं त्यांच्या ब्रेकअपची माहिती दिल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com