railway wifi esakal
देश

रेल्वेतर्फे देशातील 6 हजार स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’! महाराष्ट्रातील 550 स्थानकांचा समावेश

महेंद्र महाजन

नाशिक : भारतीय रेल्वेने (Indian Railway) देशातील सहा हजार स्थानकांत वाय-फाय यंत्रणा (WiFI system) कार्यान्वित केली आहे. प्रवाशांच्या सुविधेत भर टाकण्यासाठी पाच वर्षांत रेल्वेने हे काम केले आहे. त्यात महाराष्ट्रातील ५५० रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. प्रवासी आणि सर्वसामान्यांना डिजिटल व्यवस्थेशी जुळवून घेता यावे म्हणून रेल्वे दुर्गम स्थानकात ही सुविधा देणार आहे. (Indian Railway free wifi railway stations)

महाराष्ट्रातील ५५० स्थानकांचा समावेश

मुंबई येथे जानेवारी २०१६ मध्ये वाय-फाय उपक्रमाची सुरवात झाली. पश्‍चिम बंगालमधील मिदनापूर हे वाय-फाय सुविधा मिळविणारे पाच हजारावे, तर झारखंडमधील हजारीबाग सहा हजारावे स्थानक ठरले. रविवारी (ता.१६) ओडिशातील जरपदा स्थानकात ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली.

सुविधा ही कायमस्वरूपी

वाय-फाय सुविधा कार्यान्वित झालेल्या काही राज्यांमधील स्थानकांची संख्या अशी : आंध्र प्रदेश ५०९, आसाम २२२, बिहार ३८४, छत्तीसगड ११५, दिल्ली २७, गुजरात ३२०, कर्नाटक ३३५, मध्य प्रदेश ३९३, तमिळनाडू ४१८, उत्तर प्रदेश ७६२, पश्‍चिम बंगाल ४९८. रेल्वेस्थानकातील वाय-फाय सेवेमुळे केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे लक्ष्य गाठणे सोपे झाले आहे. रेल्वेस्थानकातील वाय-फाय सुविधा ही कायमस्वरूपी असून, त्याचा कोणताही आर्थिक भार रेल्वेवर पडत नाही. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील रेलटेल या सार्वजनिक सेवा उपक्रमाच्या मदतीने ही सुविधा दिली जात आहे. गुगल, यूएसओफच्या अखत्यारीतील दूरसंचार विभाग, पीजीसीआयएल व टाटा ट्रस्टच्या सहभागातून हे काम पूर्ण केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT