देश

लवकरच रेल्वे देणार गुडन्यूज; मुंबईसह या मार्गांना मिळणार दिलासा; १२ लाख कोटींची योजना

Railway News: मालवाहतूक दरवर्षी 3000 दशलक्ष टनांपर्यंत वाढेल आणि 1000 कोटी रेल्वे प्रवासी दरवर्षी प्रवास करू शकतील.

Chinmay Jagtap

Railway News: केंद्र सरकारने तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय रेल्वेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. याचे कारण म्हणजे,यामुळे रेल्वेची मालवाहतूक दरवर्षी 3000 दशलक्ष टनांपर्यंत वाढेल आणि 1000 कोटी रेल्वे प्रवासी दरवर्षी प्रवास करू शकतील.(Railway Marathi News)

याच बरोबर यामुळे मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांचा वेग देखिल वाढेल.रेल्वेच्या या मेगा प्लॅनमध्ये 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. (Railway 3 New corridor)

बनवण्यात येणाऱ्या या कॉरिडोरमुळे दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-चेन्नई, मुंबई-कोलकाता, चेन्नई-कोलकाता या रूटवर कंजेशन संपून जाईल.ज्यामध्ये 12 लाख कोटी रुपये खर्चून 40,900 किलोमीटरचे तीन नवीन कॉरिडॉर बांधले जाणार आहेत.यात एकूण ४३४ प्रकल्प असतील.आधी प्रत्येक प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. त्यानंतर तिन्ही कॉरिडॉरची खरी किंमत कळेल. (central Raiway News)

नव्या कॉरिडोरमुळे रेल्वे दरवर्षी 1000 कोटी प्रवाशांची वाहतूक करू शकेल. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि नवीन गाड्यांची प्रतीक्षा संपेल. तिन्ही कॉरिडॉरमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक ५५ टक्के स्वस्त आहे.याचा ठेट फायदा नागरीकांना होणार आहे.(Indian Railways News)

.

तर दरवर्षी 1600 कोटी लिटर डिझेलची बचत होणार आहे. त्यामुळे 80 रुपये प्रति लिटर डिझेल दराने डिझेलच्या खर्चात वर्षाला 1 लाख 28 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर लॉजिस्टिक खर्चात घट झाल्यामुळे 1 लाख 80 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. या प्रक्लपात रेल्वे लाईनचे दोहरीकरण, तिहरीकरण, चौथी, पांचवीं लाइनच्या व्यतिरिक्त नवी रेल्वे लाइन तयार करण्यात येणार आहे(Railway News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT