indian railway 
देश

रेल्वेमध्ये खाजगीकरण! केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

सकाळ वृत्तसेवा

जगातील सर्वात मोठ्या रेल्वेचं जाळं असलेल्या देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. आता केंद्र सरकार भारतातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वेचं नेटवर्क जवळपास 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये 109 अप अँड डाऊन खाजगी रेल्वे चालवण्यात येतील. या योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी क्षेत्राची गुंतवणूक असेल. भारतीय रेल्वेची प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी गुंतवणूक करण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. 

सरकारी अधिसूचनेनुसार, या योजनेचा उद्देश प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा आणि सुविधा देणे, सुरक्षा देणे हा आहे. प्रत्येक खाजगी रेल्वे किमान 16 डब्यांची असेल. या रेल्वे जास्ती जास्त 160 किमी प्रति तास वेगाने धावतील. या ट्रेनचे रोलिंग स्टॉक खाजगी कंपन्या खरेदी करतील. तसंच यांच्या दुरुस्तीची आणि देखभालीची व्यवस्था खाजगी कंपन्यांची असेल. रेल्वेकडून फक्त ड्रायव्हर आणि गार्ड देण्यात येतील. यातील सर्वाधिक रेल्वे मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार करण्यात येतील. खाजगी कंपन्या गाडीची खरेदी, ती चालवणे आणि देखभाल करण्याची कामे करतील.

रेल्वे 35 वर्षांसाठी हा प्रोजेक्ट खाजगी कंपन्यांना देईल. खाजगी कंपन्यांना यासाठी एनर्जी आणि हॉलेजचा खर्च हिशोबाप्रमाणे द्यावा लागेल. तसंच रेल्वे विभागाकडून या प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हर आणि गार्ड देण्यात येतील. तसंच इतर सर्व व्यवस्था खाजगी कंपन्यांना करावी लागेल. यामध्ये रेल्वे इंजिन देखभाल, दुरुस्ती यांचा समावेश असेल. तसंच याचा उद्देश प्रवासाचा वेळ कमी करणे हासुद्धा असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT