Railway  Sakal
देश

Railway : रेल्वेतून प्रवाशांनी केली टॉवेल, सतरंज्याची चोरी; कोट्यावधींचा लागला चुना

प्रवासी केवळ चादरी, ब्लँकेट, टॉवेल, उशाचे कव्हरच नाही तर चमचे, किटली, नळ, टॉयलेट बाऊल, फ्लश पाईप्स देखील चोरत असल्याची माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

रेल्वेने प्रवास करताना रेल्वेतील सामानाची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे भारतीय रेल्वेला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. उशा, ब्लँकेट, फेस टॉवेल, चादरी, कव्हर, ब्लँकेट अशा वस्तू चोरल्यामुळे रेल्वेला तब्बल कोट्यावधींचा चुना लागला आहे.

प्रवासी केवळ चादरी, ब्लँकेट, टॉवेल, उशाचे कव्हरच नाही तर चमचे, किटली, नळ, टॉयलेट बाऊल, फ्लश पाईप्स देखील चोरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. तर बिलासपूर आणि दुर्ग येथून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमधील ब्लँकेट्स, चादरी, उशाचे कव्हर, फेस टॉवेल यांची सातत्याने चोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

बिलासपूर झोनमधून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील उशा, ब्लँकेट, फेस टॉवेल, चादरी, कव्हर, ब्लँकेट असे मिळून गेल्या चार महिन्यांत सुमारे 55 लाख 97 हजार 406 रुपयांचा माल चोरीला गेला आहे. चार महिन्यांत 12 हजार 886 फेस टॉवेल चोरीला गेले असून, त्यांची किंमत 5 लाख 59 हजार381 रुपये आहे. दुसरीकडे, एसीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी 4 महिन्यांत 18 हजार 208 बेडशीट चोरल्या असून, त्यामुळे रेल्वेला 28 लाख 16 हजार 231 रुपयांचा फटका बसला आहे.

तसेच चार महिन्यांत रेल्वे प्रवाशांकडून 19 हजार 767 पिलो कव्हर्स चोरीला गेल्याने रेल्वेचे 10 लाख 14 हजार 837 रुपयांचे नुकसान झाले आहे. 2 हजार 796 ब्लँकेट्स चोरीला गेल्याने रेल्वेला चार महिन्यांत 11 लाख 71 हजार 999 रुपयांचा फटका बसला आहे. तर 312 उशांच्या चोरीमुळे रेल्वेला 34 हजार 956 रुपयांचा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT