vande bharat xpress sakal media
देश

नव्या 75 वंदे भारत ट्रेन ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये धावणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशात आत्मनिर्भर भारत मोहिमेचे वारे वाहत आहेत. त्या धर्तीवर भारतीय रेल्वेमधील (Indian Railway) जास्तीत जास्त ट्रेन स्वदेशी बनावटीच्या करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना (Railway ministry scheme) आहे. त्यानुसार सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन (Vande bharat express) वाढविण्यात येत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागांतून येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात (starts from august - September) नव्या ७५ ट्रेन धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील तीन वर्षांत चारशे वंदे भारत ट्रेन चालविण्यात येण्याची घोषणा केली. त्याशिवाय १०० पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे तीन वर्षांत विविध मार्गांवर ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन चालविण्यात येणार आहेत. दरम्यान, देशातील सर्व भागांत अशा ट्रेनची सेवा मिळणार आहे. मार्ग आणि वेळापत्रकाला लवकरच अंतिम रूप दिले जाणार आहे. सध्या अशा ट्रेनची निर्मिती रेल्वेच्या चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये सुरू आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ट्रेन सुरू करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून वंदे भारत ट्रेनची संकल्पना, विकास आणि निर्मिती केली गेली. फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली.

‘वंदे भारत ट्रेन’ची वैशिष्ट्ये

- रिक्लाइनिंग आसने, जीवाणूमुक्त वातानुकूलित यंत्रणा आणि पुशबॅक सुविधा
- ट्रेनच्या तापमानापासून प्रत्येक इलेक्ट्रिक बोर्डपर्यंत सर्व आवश्यक यंत्रणांचे निरीक्षण करण्यासाठी एक केंद्रीकृत कोच
- प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन खिडक्या
- ट्रेनमध्ये पावसाळा आणि पूरसदृश परिस्थितीसाठी खास रचना असलेली उपकरणे
- प्रत्येक डब्यात खास मोठे दिवे असतील जे दीर्घकाळ टिकतील
- वीज खंडित झाल्यास तीन तास व्हेंटिलेशन उपलब्ध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, सरकारने जारी केली ही महत्त्वाची नोटीस

Solapur News: २० टक्के प्रमाणपत्रे खोटी! साेलापूरात कामगारांना अनुभव प्रमाणपत्र देणारे ठेकेदारही बोगस;'कामगार मंडळा’कडून तपास सुरू..

Ajay Devgn: ‘शैतान २’चा इशारा? दोन वर्षांनंतर अजय देवगच्या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली!

Success Story: आदिवासी युवकाची मेळघाटातून ब्रिटनपर्यंतची झेप; चिलाटी येथील किशोर बेठेकर यांना ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT