Vande Bharat Fare eSakal
देश

Vande Bharat : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वंदे भारतचं तिकीट कमी होण्याची शक्यता; चर्चा सुरू

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

Sudesh

वंदे भारत एक्स्प्रेस हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र, कमी अंतरावरील कित्येक वंदे भारत रेल्वेंकडे प्रवासी पाठ फिरवताना दिसत आहेत. याला कारण म्हणजे वंदे भारतचं मोठं भाडं. महाग असल्यामुळे यातील कित्येक सीट मोकळ्याच राहत आहेत.

यामुळेच आता रेल्वे विभाग या तिकिटांचे दर कमी करण्याचा विचार करत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिल्याचं वृत्त झी न्यूजने प्रसिद्ध केलं आहे. (Vande Bharat Express)

सध्या देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस धावते. यातील कासारगोड-तिरुवअनंतपुरम या मार्गावरील गाडीत १८३ टक्के बुकिंग असते. मात्र, कमी अंतरावरील अनेक वंदे भारत रेल्वेंमध्ये ५० टक्केही बुकिंग नाही.

इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये २१ टक्के बुकिंग होत असल्याचं पीटीआयच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही अशीच परिस्थिती आहे. कमी अंतरावरील वंदे भारतमधील एसी चेअर कारचं सरासरी भाडं ९५० रुपये आहे. तर, एक्झिक्युटिव्ह चेअर कारचं भाडं १.५२५ रुपये आहे.

देशातील सर्वाधिक अंतरावर धावणाऱ्या वंदे भारतचा प्रवास १० तासांचा आहे, तर सर्वात कमी अंतरावरील वंदे भारतमधील प्रवास ३ तासांचा आहे. यातील कमी अंतरावरील वंदे भारतमध्ये मोठ्या प्रमाणात सीट रिकाम्या राहत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये प्रवास करावा यासाठी आता याचं भाडं कमी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT