Indian Railways esakal
देश

रेल्वेकडून प्रवाशांना खास गिफ्ट; दिवाळीनिमित्त रुळावरुन धावणार जादा 'ट्रेन'

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशभरात दिवाळी सण (Diwali) साजरा केला जात आहे.

दिल्ली : सध्या देशभरात दिवाळी सण (Diwali) साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी भारतीय रेल्वेनं (Indian Railways) विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. यासोबतच प्रवास सुकर करण्यासाठी नियमित गाड्यांमध्ये जादा डबेही जोडण्यात आले आहेत. वास्तविक, सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. याचाच विचार करुन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

दिल्लीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डिंपी गर्ग यांनी सांगितलं, की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं 79 विशेष गाड्या सुरु केल्या असून या गाड्यांमध्ये 108 अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. कोरोना खबरदारीचे पालन करून आम्ही फक्त आरक्षित प्रवाशांनाच गाड्यांमध्ये प्रवेश देत आहोत. त्यामुळं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होत आहे. यासोबतच स्टेशनच्या बाहेर होल्डिंग एरिया देखील तयार करण्यात आलाय. ज्यात एकावेळी 1000 प्रवासी बसू शकतात. सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रवाशाच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी रेल्वेनं बनावट एजंटांविरोधात मोठी मोहीम सुरू केलीय.

दरवर्षी अशा बातम्या येतात, की बनावट एजंट लोकांची लूट करुन त्यांच्याकडून आधीच पैसे उकळतात. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे यावेळी लोकांवर बारीक लक्ष ठेवून आहे. यासोबतच रेल्वे कोरोनाबाबतही गंभीर दिसत आहे. दरम्यान, 110 विशेष गाड्यांद्वारे 668 फेऱ्या पूर्ण केल्या जातील, जेणेकरून लोकांना दिवाळीत रेल्वेकडून चांगली सेवा देता येईल. रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर कोविड प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. रेल्वे प्रवाशांसाठी मास्क अनिवार्य करण्यात आला असून, वेळोवेळी स्वच्छता करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT