देश

बर्फाच्या तुफान वर्षावातही ऑन ड्युटी 24 तास; आर्मी मॅनचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय सैनिकाचा व्हिडिओ व्हायरल, लाखो लोकांनी पाहिला व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

अवघड परिस्थितीमध्येदेखील अभेद्य पर्वताप्रमाणे उभे राहून, संकटाचा सामना करण्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भारतीय सैनिक (Indian Army);त्याची ही एक खासियत लष्करानेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली. या व्हिडिओमध्ये एका भारतीय सैनिक कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फाच्या वादळामध्ये उभा राहून आपली ड्युटी करताना दिसत आहे.

गुडघ्यापर्यंत साचलेल्या बर्फामध्ये उभा राहून भारतीय सैनिकाच्या देशसेवा करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Indian Army Viral Video)दिसत आहे की कशा प्रकारे साहसी भारतीय सैनिक बर्फाच्या वादाळामध्ये हाथामध्ये रायफल घेऊन उभा आहे. वादळ इतका वेगवाना आहे की सैनिकाच्या गुडघ्यापर्यंत बर्फ साचला आहे. पण बर्फाचे वादळ देखील त्याला त्याचे कर्तव्य करण्यापासून थांबवू शकत नाही.

10 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ

हा व्हिडिओ उधमपूर, जनसंपर्क अधिकारी (पीआरओ उधमपूर, संरक्षण मंत्रालय) यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर अपलोड केला आहे. ज्याला आतापर्यंत १० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओला ५० हजारपेक्षा जास्त लाईक्स ११ हजार अधिकृत रिट्विट आणि हजारो कॉमेंट्स केल्या आहे

लोकांचा प्रतिसाद पाहून ९ जानेवारीला @proudhampur टिव्ट करून म्हटले की, हा सैनिक समोर उभा असलेल्या शत्रूचा द्वेष करतो म्हणून नव्हे तर, मागे असलेल्यांसाठी (देशातील नागरिकांसाठी), ज्यांच्यावर तो प्रेम करतो त्यांच्यासाठी उभा आहे. एक मिलियन व्ह्युज साठी सर्वांचे आभार, प्रेम आणि साथ दिल्याबद्दल धन्यवाद

केंद्रीय मंत्र्यांनी केले कौतुक

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतीय सैनिकाचा व्हिडिओ रिट्वट करताना सांगितले आहे की, ''भारतीय सैनिकांचे नेहमी ऋणी आहोत.'' हजारो युजर्सने भारतीय सैनिकांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT