Indian Student IN china Sakal
देश

भारतीय विद्यार्थ्यांना तब्बल 2 वर्षांनी चीनमध्ये परतण्याची सशर्त परवानगी

चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परत यावं लागलं होतं.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारत सरकारने तब्बल दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर भारतीय विद्यार्थांना चीनला जाण्याची परवानगी दिली आहे. भारतीय विद्यार्थी आता चीनमध्ये सशर्त परत येऊन त्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करु शकतात असं चीनमधील भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परत यावं लागलं होतं.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी २५ मार्च रोजी बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर भारतीय विद्यार्थ्यांना चीनमध्ये परत येण्यासाठी विचार करण्याची तयारी असल्याचं चीनच्या बाजूने सांगण्यात आलं होतं. दरम्यान आता हा निर्णय घेण्यात आला असून भारतीय विद्यार्थ्यांना 8 मे पर्यंत फॉर्म भरून माहिती देण्याची विनंती भारतातील चीनमधील दुतावासाने दिली आहे.

परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर चीनने सहमती दर्शवण्यात आली होती. त्यानंतर चीनने काही अटी घालत परवानगी दिली आहे. चीनमधील भारतीय दूतावासांनी विद्यार्थ्यांना एक गुगल लिंक देऊन नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन केलं आहे. तसेच चीनच्या बाजूने भारतीय विद्यार्थ्यांची यादी बनवण्यासाठी आणि त्यांना परत येऊन शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान २०२० च्या फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये कोरोना जास्त पसरण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे तेथे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना परत यावं लागलं होतं. त्यानंतर दोन वर्ष कोरोनाचे सावट जगभर पसरले होते. या काळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं शैक्षणिक नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना उर्वरित शिक्षण घेण्यासाठी चीन सरकारकडून सशर्त परवानगी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT