भारताचे अफगाणिस्तानातील 22 हजार 251 कोटींचे प्रकल्प अडचणीत sakal
देश

भारताचे अफगाणिस्तानातील 22 हजार 251 कोटींचे प्रकल्प अडचणीत

देशाच्या विकासाच्या हेतूने भारताने तेथे अनेक प्रकल्प सुरु केले आहेत

सकाळ वृत्तसेवा

काबूल/नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर (afghanistan) तालिबानचा (taliban) ताबा आल्याने या देशात भारताने उभारलेल्या सुमारे चारशे प्रकल्पांचे काय होणार, अशी चिंता व्यक्त होत आहे. तालिबानी सत्तेमुळे भारत (india) आणि अफगाणिस्तानमधील व्यापार थंडावणार असल्याने भारतात सुकामेवा महागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विविध प्रकल्पांद्वारे भारताने अफगाणिस्तानात २२ हजार २५१ कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात दोन देशांदरम्यान १० हजार ३८७ कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. त्याआधीच्या वर्षातही ११ हजार १३१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. अफगाणिस्तानबरोबर भारताचे पूर्वीपासून चांगले संबंध असल्याने आणि या देशाच्या विकासाच्या हेतूने भारताने तेथे अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. अफगाणिस्तानची संसदही भारतानेच बांधून दिली आहे. त्यासाठी भारताला नऊ कोटी डॉलर खर्च आला होता.

भारताच्या परराष्ट्र धोरणात अफगाणिस्तानला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानात विकास घडवून आणण्यासाठी भारत प्रयत्नशील होता. अनेक रस्ते प्रकल्पांबरोबरच शाळा, रुग्णालये, धरणे, विद्युतीकरण आणि इतर अनेक पायाभूत सुविधा भारताने येथे उभारल्या आहेत. अनेक प्रकल्पांचे कामही सुरु आहे.

इराणमधील चाबहार बंदरातही भारताने मोठी गुंतवणूक केली असून यामार्गाने अफगानिस्तानात आणि तिथून युरोपपर्यंत पोहोचण्याचा भारताचा प्रयत्न आहे. यासाठी अफगाणिस्तानात रस्ते प्रकल्पांचे काम भारतातर्फे सुरु आहे. आता मात्र हा प्रकल्पही अडचणीत सापडला आहे.

अनेक प्रकल्प बंद पडण्याची शक्यता; व्यापारही थंडावणार

या वस्तूंची होते आयात

  • अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ता, सुका मेवा, बेदाणे, सफरचंद, चेरी, हिंग, जिरे, केशर, खरबूज, टरबूज

महत्त्वाचे प्रकल्प...

  • सलमा धरण (हेरत) : ४२ मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प

  • झारंज-देलारम महामार्ग : इराणला जोडणारा २१८ किमीचा रस्ता

  • अफगाणिस्तानची संसद

  • स्टार पॅलेस

  • बागलाण प्रांतात विद्युत पुरवठा जाळे

  • अनेक प्रांतांमध्ये आरोग्य सेवा केंद्र

  • भारताकडून ४०० बस आणि २०० मिनीबस भेट

  • लष्करी वाहने, हेलिकॉप्टर आणि विमानेही भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त! वाढत्या तेलदरांचा परिणाम; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Mumbai Mayor Cup Carrom Tournament: कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा! महापौर चषकात एकतर्फी विजयाने सर्वांचे लक्ष वेधले

Solapur Accident: कार अन्‌ टिप्परच्या धडकेत ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; अहिल्यानगर-टेंभुर्णी महामार्गावर जातेगाव येथे भीषण अपघात, तिघेजण जखमी..

मुंबई-बंगळूर 'वंदे भारत स्लीपर' पुणेमार्गेच, दर राजधानीपेक्षा जास्त; २०० किमी प्रवास केला तरी ४०० किमीचं भाडं द्यावंच लागणार

Nashik: लग्नानंतर सासरचं नाव लावण्यावरून वाद, जबरदस्तीने गर्भपात अन् ३ कोटींची मागणी; महिला लोकप्रतिनिधीच्या डॉक्टर पतीला अटक

SCROLL FOR NEXT