Bullet Train Sakal
देश

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2027 मध्ये धावणार...

तर सुरत-बिलिमोरा दरम्यान होणार बुलेट ट्रेनचं पहिलं ट्रायल

सकाळ डिजिटल टीम

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2027 मध्ये धावेल, तर 2026 मध्ये बुलेट ट्रेनची ट्रायल सुरु होणार असल्याची माहीती नॅशनल हायस्पीड कॉरिडॉर (NHRC ) चे संचालक सतीश अग्निहोत्री यांनी दिलीय. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातला पहिली बुलेट ट्रेन प्रोजेक्ट होतोय. या प्रोजेक्टसाठीचं भुसंपादन 99 टक्के पुर्ण झालं आहे. सुरत येथे बुलेट ट्रेन स्थानकाचं उद्घाटन 2023 मध्ये पुर्ण होईल असा विश्वास अग्निहोत्री यांनी व्यक्त केलाय. सुरत ते बिलिमोरा दरम्यानच्या 50 किलोमीटरच्या पट्टयात बुलेट ट्रेनचं ट्रायल सुरु होणार आहे.

(India's first bullet train will be operational in 2027)

जपानचे राजदुत आणि डेलिगेशन या प्रोजेक्टच्या पाहणीकरिता आले होते. भुसंपादनात अडचणी आल्याने तसेच, कोरोना महामारीमुळे बुलेट ट्रेन प्रोजेक्टला ब्रेक लागला होता. जपानचे राजदुत सतोशी सुझुकी यांनी या प्रकल्पाची पाहणी केली, जपानच्या सहकार्याने बुलेट ट्रेन प्रोजेक्ट होत आहे. भारताची ईच्छा असेल तर आम्ही दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी सहकार्य करु असं विधान त्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

मुंबई- अहमदाबाद गुजरात दरम्यान होणाऱ्या बुलेटट्रेन कॉरिडॉरचं अंतर 508 किलोमीटर आहे. तर बुलेट ट्रेन 350 कीलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार आहे. यामुळे 2 तासातचं हे अंतर कापले जाईल. या कॉरिडॉरच्या दरम्यान 12 स्टेशन असणार आहेत. यातील 8 स्टेशन गुजरातमध्ये तर 4 महाराष्ट्रात असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पुण्याला मिळाले नवीन वैद्यकीय महाविद्यालय! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु

Vastu Tips: कपाटाच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' ५ गोष्टी; घरात येऊ शकते गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा! जाणून घ्या वास्तुनियम...

IPL 2027 Trade: यॉर्करने भल्याभल्यांना गार करणारा गोलंदाजाचं SRH संघात पुनरागमन, पण कोटींचं नुकसान; दिल्ली कॅपिटल्ससोबत मोठी ट्रेड

Mulshi News : दुष्काळग्रस्त असलेल्या तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळला; तालुक्यातील शेतकरी शासनाविरोधात आक्रमक

गोकुळच्या स्टेजवर जुना हिशेब? अमर खोत आणि बाबासाहेब असुर्लेकर यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT