

T Natarajan Returns to SRH from Delhi Capitals | IPL 2027 Trade
Sakal
Sunrisers Hyderabad & Delhi Capitals IPL player trade: आयपीएल २०२७ स्पर्धेला अजून वेळ असला तरी फ्रँचायझींची संघबांधणीसाठी तयारी सुरू आहे. आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यापासूनच पुढच्या हंगामापूर्वी मोठे ट्रेड होताना दिसत आहेत.
आता आणखी एक मोठी खेळाडूंची ट्रेडिंग सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झाली आहे. या दोन संघांनी डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) आणि लेग स्पिनर झिशन अन्सारी (Zeeshan Ansari) यांचे ट्रेडिंग केले आहे.