India Foreign Minister S Jaishankar  esakal
देश

भारत-चीन संबंधांचा कठीण काळ सुरुय - परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

सकाळ डिजिटल टीम

म्यूनिच - भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील संबंधांचा कठीण काळ सुरु असल्याचं म्हटलं आहे. चीनकडून सीमा कराराचे उल्लंघन केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध हे कठीण परिस्थितीतून जात आहेत असं जयशंकर म्हणाले. सीमेवरील वातावरण दोन्ही देशातील संबंध कसे असतील हे निश्चित करतील असंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्यूनिच सुरक्षा परिषद २०२२ मध्ये बोलत होते.

एस जयशंकर यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की, भारताला चीनपासून एक समस्या आहे आणि ती म्हणझे १९७५ पासून गेली ४५ वर्षे सीमेवर शांतता आहे. परिस्थिती स्थिर होती. आता ही परिस्थिती बदलली आहे कारण आम्ही चीनसोबत सीमारेषेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनात न करण्याच्या केलेल्या कराराचे त्यांनी उल्लंघन केले आहे.

सीमेवर असलेल्या वातावरणाचा परिणाम दोन्ही देशांचे संबंध निश्चित करेल. सध्या तरी चीनसोबतचे संबंध कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. पश्चिमेकडील देशांसोबत भारताचे संबंध जून २०२० पर्यंत चांगले होते असंही एस जयशंकर म्हणाले.

पेंगाँगमध्ये झटापटीनंतर भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणावाचं वातावऱण सुरु झालं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूने सैनिक आणि शस्त्रसज्जता वाढवण्यात आली होती. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक भिडल्यानंतर तणाव वाढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT