देश

जगभर भारताची प्रतिष्ठा वाढली : पंतप्रधान

पीटीआय

नवी दिल्ली : देशातील 130 कोटी नागरिकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला असून, मागील पाच वर्षांमध्ये जगातील भारताची प्रतिष्ठा वाढली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

अमेरिका दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. मोदींनी या वेळी स्वागतासाठी जमलेल्या हजारो नागरिकांचे आभारही मानले. अमेरिका दौऱ्यावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, "संयुक्त राष्ट्रांमध्ये 2014 मध्ये पहिल्यांदा भाषण केल्यानंतर जागतिक पातळीवर देशाच्या सन्मानामध्ये भर पडली होती, भारताप्रतीचा जगभरातील उत्साह वाढला असून, हे केवळ 130 कोटी भारतीयांमुळे शक्‍य झाले आहे. ह्युस्टनमधील अतिभव्य अशा "हाउडी मोदी' कार्यक्रमातून भारतीयांची ताकद दिसली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्‌स पक्षांच्या सदस्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.''

आजच्या भाषणामध्ये तीन वर्षांपूर्वी भारतीय सैनिकांनी 28 सप्टेंबर रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकलाही उजाळा दिला. भारताच्या शूर सैनिकांनी त्या वेळी देशाची ताकद आणि क्षमता दाखवून दिली होती, असे गौरवोद्‌गार मोदी यांनी काढले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचं' सुरज चव्हाणने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...'मी त्याचा सारखा एकदाच पण टॉप...'

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT