Cash 
देश

Economy of India: ...तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ शकते; AIBEA चा सूचक इशारा

सकाळ डिजिटल टीम

इंदूर : भारताच्या कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यावर चिंता व्यक्त करताना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या (एआयबीईए) प्रमुख पदाधिकाऱ्याने गुरुवारी दावा केला की, या समस्येकडे दुर्लक्ष केले तर देशाला श्रीलंकेसारख्या गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.

एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी इंदूरमध्ये संघटनेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, “सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाचा परकीय चलन साठा कमी होत आहे.

आपली आयात सातत्याने वाढत आहे, तर निर्यात कमी होत आहे. व्यंकटचलम म्हणाले की, परकीय चलनाच्या साठ्यात होणारी घट रोखण्यासाठी सरकारने सर्वप्रथम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) संकटग्रस्त क्षेत्राला मदत करणे आवश्यक आहे. जेणेकरुन भारताचे अवलंबित्व कमी होईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय नारायण राणे यांच्याकडे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या सरकारच्या धोरणाचा निषेध करताना AIBEA सरचिटणीस म्हणाले, "जर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण झाले तर केवळ जनतेची बचतच धोक्यात येऊ शकत नाही, तर गावकरी, शेतकऱ्यांची बचत देखील धोक्यात येऊ शकते. तसेच शेतकरी. एमएसएमई क्षेत्रातील उद्योजक आणि महिलांनाही कर्ज घेताना खूप अडचणी येतील.

ते म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाचा मार्ग सुकर करण्यासाठी सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक आणू शकते. मात्र असे विधेयक आणले गेले तर सार्वजनिक, खाजगी, सहकारी आणि इतर क्षेत्रातील बँकांचे 3.5 लाख कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणारे AIBEA ताबडतोब संपावर जाईल, असा इशारा वेंकटचलम यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT