cervical cancer Marathi News
cervical cancer Marathi News cervical cancer Marathi News
देश

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगावर लवकरच स्वदेशी लसी; नवी आशा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरची (cervical cancer) पहिली स्वदेशी लस (Indigenous vaccine) मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध लस तयार करण्याची परवानगी दिली आहे. या लसीचे नाव CERVAVAC असे ठेवले आहे. या वर्षाच्या अखेरीस ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. (cervical cancer Marathi News)

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध क्वाड्रिव्हॅलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लसीसाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली होती. या लसीच्या फेज २ आणि ३ चाचण्या झाल्या आहेत. चाचणीमध्ये ही लस सर्व वयोगटातील महिलांवर प्रभावी ठरल्याचा दावा केला जात आहे. या लसीचा सर्व प्रकारच्या एचपीव्ही विषाणूवर परिणाम दिसून आला आहे.

२०२१ मध्ये लॅन्सेटचा अभ्यासही झाला होता. एचपीव्ही लसीमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (cervical cancer) प्रमाण ९० टक्के पर्यंत कमी होऊ शकते असे सांगण्यात आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमधील दुसरा प्रमुख कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

  • गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांमध्ये (Women) होतो. परंतु, काहीवेळा तो पुरुषांनाही होऊ शकतो. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाच्या बाबतीत जननेंद्रियाचा संसर्ग होतो. वेळीच काळजी घेतली तर उपचार करता येतो. परंतु, उशीर झाल्यास किंवा संसर्ग पसरल्यास मृत्यू होऊ शकतो.

  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जगातील महिलांमध्ये चौथा सर्वांत सामान्य कर्करोग आहे. २०२० मध्ये जगभरात सहा लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आणि ३.४२ लाख मृत्यू झाले. २०२० मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ९० टक्के प्रकरणे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आली आहेत.

  • गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे होतो. एचपीव्ही हे गर्भाशयाच्या मुखाच्या ९५ टक्के पेक्षा जास्त कर्करोगाचे कारण आहे. एचपीव्ही सहसा लैंगिक संभोगाद्वारे पसरतो.

  • डब्ल्यूएचओच्या मते जे स्त्रिया आणि पुरुष अधिक लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात त्यांना आयुष्यात कधीतरी एचपीव्हीची लागण होऊ शकते. काही लोकांना अनेक वेळा संसर्ग होऊ शकतो.

  • निरोगी स्त्रीला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी साधारणपणे १५ ते २० वर्षे लागतात. जर एखाद्या महिलेची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल किंवा एचआयव्हीचा उपचार केला गेला नाही तर तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी ५ ते १० वर्षे लागतात. डब्ल्यूएचओच्या मते, एचआयव्ही ग्रस्त महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता सहा पट जास्त असते.

भारतात काय परिस्थिती आहे?

  • भारतात ४४ कोटींहून अधिक महिला राहतात. १५ ते ६४ वयोगटातील महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.

  • नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार, भारतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.

  • २०१५ मध्ये देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची ६५,९७८ प्रकरणे नोंदवली गेली आणि २९,०२९ मृत्यू झाले. त्याचवेळी २०२० मध्ये ७५,२०९ प्रकरणे नोंदवली गेली आणि ३३,०९५ मृत्यू झाले.

लक्षणे आणि उपचार

  • गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे त्याची लक्षणे सुरुवातीला दिसत नाही. जेव्हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असतो तेव्हा सामान्यतः गुप्तांगातून रक्तस्राव जास्त होतो.

  • योनीमार्गात संसर्ग, युरिन इन्फेक्शन, सेक्स केल्यानंतर रक्त येणे, योनीतून स्राव होणे, वजन कमी होणे, पायांना सूज येणे अशी लक्षणे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात दिसून येतात.

  • हा आजार सुरुवातीलाच पकडला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. भारतात एक लस आहे. परंतु, सध्या ती फक्त ९ ते २६ वयोगटातील मुलींसाठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT