Indore Temple Accident esakal
देश

Indore Incident: 36 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेलं 'ते' मंदिर जमीनदोस्त! काय घडलंय वाचा

पन्नासहून अधिक मजूर, तीन जेसीबी आणि एका पोकलेनच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूर इथं रामनवमीच्या दिवशी झालेल्या भीषण दुर्घटनेत मंदिराजवळच्या विहिरीत पडून ३६ भाविकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या मंदिराबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या विहिरीवर स्लॅब टाकून बाजूला मंदिर उभारण्यात आलं होतं. ते मंदिरच आता जमीनदोस्त करण्यात आलं आहे. याला बजरंग दलानं विरोध करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनानं हा विरोधही मोडून काढला. (Indore Incident temple that caused death of 36 people was demolished)

इंदूरमधील पटेल नगर उद्यानात जे मंदिर उभारण्यात आलं होतं, ते अनधिकृत होतं. त्यामुळं दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या या अनधिकृत मंदिर जमीनदोस्त करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. त्यासाठी पहाटे पाच वाजता ५० मजूर, तीन जेसीबी आणि एक पोकलेन मशीसह प्रशासनं घटनास्थळी पोहोचलं. मोठ्या पोलीस बंदोबस्तात मंदिर पाडण्याचं काम सुरु करण्यात आलं. बेलेश्वर मंदिर पाडण्यापूर्वी त्यातील देवतांच्या मूर्ती विधीवत स्थलांतरीत करण्यात आल्या.

मंदिर जमीनदोस्त केल्यांनतर त्यातून जो राडारोड जमा झाला त्यातून शेजारची विहिरही बुजवण्यात आली. ज्यामध्ये पडून ३६ भाविकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. असुरक्षित जागेत अनधिकृत मंदिरामुळेच मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

बजरंग दलानं कारवाईला केला विरोध

मंदिर जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला विरोध करण्यासाठी सकाळी बजरंग दलाचे कार्यकर्ते पण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पटेल नगरमध्ये घोषणाबाजी केली तसेच मंदिर तोडण्याला विरोध दर्शवला. पण त्यांचा विरोध मोडीत काढत पोलिसांनी त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT