Silent Heart attack Esakal
देश

Silent Heart attack: इंदूरमध्ये सायलेंट हार्ट अटॅकची आणखी एक घटना, विद्यार्थी वर्गात बेशुद्ध पडला अन्..... व्हिडिओ व्हायरल

Silent Heart attack: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सायलेंट हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. कोचिंग क्लासदरम्यान एक विद्यार्थी बेशुद्ध होऊन खाली पडला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा VIDEO व्हायरल झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका कोचिंग विद्यार्थ्याचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. गर्दीने भरलेल्या वर्गात विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. इंदूरमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

कोचिंग क्लासमध्ये बसलेला विद्यार्थी बेंचवर पडला.त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण सायलेंट हार्ट अटॅक असल्याचे मानले जात असले तरी शवविच्छेदनानंतरच याची पुष्टी होईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ही घटना घडली. सागर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून इंदूरला येऊन एमपीपीएसईची तयारी करत होता. बुधवारी हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे आपल्या वर्गात गेला होता. मात्र, वर्गात शिकत असताना अचानक तो बाकावर पडला, त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विद्यार्थी राजा इंदूरमधील सर्वानंद नगरमध्ये राहत होता आणि इंदूरला आल्यानंतर एमपीपीएससीची तयारी करत होता.

महिनाभरापूर्वीही सायलेंट हार्ट अटॅकमुळे एका चित्रकाराचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता, त्यात चित्रकार अचानक बेशुद्ध पडला होता. आशिष मुन्नालाल सिंग असे मृताचे नाव आहे. मृत स्कीम क्रमांक 71 येथील रहिवासी होता. दस्तूर गार्डनजवळील एका ठिकाणी काम करत असताना सायलेंट हार्ट अटॅक आला होता.

तसेच 19 दिवसांपूर्वी बीए प्रथम वर्षाच्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा घरातच संशयास्पद मृत्यू झाला होता, त्यात विद्यार्थिनीला अचानक छातीत दुखणे व घाबरणे जाणवू लागले आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर हा सायलेंट हार्ट अटॅकच असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

SCROLL FOR NEXT