india pakistan indus water Sakal
देश

भारत पाकिस्तान दरम्यानची सिंधूनदी पाणीप्रश्नावरील चर्चा अंतिम टप्प्यात

सिंधू नदी पाणी करार 1960 नुसार ही बैठक पार पडत आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दरम्यान होत असलेली सिंधूनदी पाणीप्रश्नावरील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसाच्या चर्चासत्रामध्ये दोन्ही बाजूंच्या साकारात्मक प्रतिसादाने ही बैठक अंतिम टप्प्यात आहे. सिंधू नदी पाणी करार 1960 नुसार ही बैठक पार पडत आहे.

(Indus Water Talk Between India Pakistan)

पाकिस्तानची सहा सदस्यीय समिती या बैठकीत आहे. त्यांच्या या समितीमध्ये महिलांचाही सामावेश आहे. पंजाबमध्ये सिंधू नदीचे पाणी किती प्रमाणात रोखून ठेवले जाणार यावर ही चर्चा होत असते. 1960 मध्ये झालेल्या सिंधूनदी पाणी करारानुसार या बैठकीत निर्णय होत असतात. पाकिस्तानकडून या समितीत सय्यद मोहम्मद, मेहर अली शहा, सहिबझाद खान, हबीब बोदला, समन मुनीब आणि खालिद मोहम्मद यांचा सामावेश आहे.

दरम्यान भारताची सहा सदस्यीय समितीचे अध्यक्ष हे एके पाल हे आहेत. दरम्यान ही बैठक इस्लामाबादमध्ये पार पडली होती. सिंधू आयोगाची ही बैठक 1 ते 4 मार्च दरम्यान पार पडली होती. त्यावेळी भारताच्या सहा सदस्यीय समितीचे अध्यक्ष पीके सक्सेना हे होते.

सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांच्या पाण्याच्या वाटपावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 च्या तरतुदींनुसार सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांपैकी सतलज, बियास आणि रावी या तीन पूर्वेकडील नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार आहे, तर पश्चिमेकडील चिनाब, झेलम आणि सिंधू या नद्यांवर पाकिस्तानचा अधिकार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कराराच्या तरतुदींनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजूंनी दरवर्षी किमान एकदा भेट होणे आवश्यक आहे. 23-24 मार्च 2021 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत जलविज्ञान आणि पूर व्यवस्थापनावर चर्चा झाली होती. त्यानंतर आता होत असलेली बैठक अंतिम टप्प्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

SCROLL FOR NEXT