Anil Ambani Sakal
देश

Anil Ambani: उद्योगपती अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी सुरू, काय आहे प्रकरण?

अनिल अंबानी यांची फेमा कायद्याच उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती.

राहुल शेळके

Anil Ambani: अनिल अंबानी सध्या मुंबईच्या ईडी कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. अनिल अंबानी यांची फेमा कायद्याच उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

उद्योगपती अनिल अंबानी सोमवारी (3 जुलै) मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात पोहोचले. येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये ईडीसमोर हजर झाले होते.

सकाळी 10 वाजता अंबानी ईडी मुंबईच्या कार्यालयात पोहोचले तर त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी बाहेर थांबले होते. परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 (FEMA) अंतर्गत चौकशी सुरू आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अंबानींना दिलासा दिला होता. तसेच आयकर विभागाला अनिल अंबानींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे सांगितले होते.

मार्च 2020 मध्ये, अनिल अंबानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) YES बँकेच्या एक्सपोजरच्या संदर्भात ADAG च्या स्थानाबाबत चौकशी केली होती.

रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्यानुसार, अंबानी यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, ADAG आणि येस बँक यांच्यातील सर्व व्यवहारांमध्ये कायद्याचे आणि आर्थिक नियमांचे पालन केले आहे.

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि इतरांच्या संबंधात, अंबानी म्हणाले होते की, रिलायन्स समूहाचा कपूर, त्यांची पत्नी किंवा मुली किंवा त्यांच्याद्वारे नियंत्रित कोणत्याही संस्थेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT