industrialist Rajiv bajaj criticize Modi government on lockdown
industrialist Rajiv bajaj criticize Modi government on lockdown 
देश

संसर्ग थांबला नाही, उलट अर्थव्यवस्था उद्धवस्थ झाली; 'या' प्रसिद्ध उद्योगपतीची टीका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- देशातील प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारताने कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी पश्चिमी देशांचे अनुक्रमण केलं आणि देशात कडकडीत टाळेबंदी लागू करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबला नाही, उलट अर्थव्यवस्था पूर्ण उद्धवस्त झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ परिषदेच्या माध्यमातून राजीव बजाज यांनी हा निशाणा साधला आहे. देशातील अनेक महत्वाचे लोक सत्य बोलण्यास घाबरत आहेत. तसेच देशाला सहिष्णू आणि संवेदनशील ठेवण्यासाठी देशातील काही गोष्टींमध्ये सुधार करायला हवा, असंही ते म्हणाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

टाळेबंदीसंबंधी बोलताना राजीव बजाज यांनी मोदी सरकारने राबवलेल्या उपाययोजनांवर टीका केली आहे. कोरोना महामारीला थांबवण्यासाठी आपण पूर्व देशांकडे न पाहता पश्चिमी देशांकडे पाहिलं. त्यामुळे आपलं नुकसान झालं असल्याचं ते म्हणाले आहेत. देशात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीमध्ये अनेक चुका करण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपलं नुकसान झालं आहे. टाळेबंदी लागू करुन सुद्धा आज विषाणू आपल्यासोबत आहे आणि त्याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना विषाणू महामारीला आपल्याला हरवता आलं नाही. मात्र, कडक टाळेबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबगाईला आली आहे, असं बजाज म्हणाले आहेत.

लोकांच्या मनामध्ये कोरोना विषाणूची भीती आहे ती अगोदर काढायला हवी. त्यासाठी एक निश्चित अशी योजना हवी. देशाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकतात. त्यामुळे त्यांनी आता नागरिकांना दिलासा द्यायला हवा. आपण पुढे जात आहोत. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे संक्रमणाला घाबरु नका, असा विश्वास मोदींनी जनतेला द्यायला हवं, असंही बजाज म्हणाले आहेत.
------------
कलेक्टरनं ऑफिसमध्येच केला बलात्कार; महिलेचा गंभीर आरोप
------------
भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण
------------
बजाज यांनी केंद्र सरकारने घोषीत केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजवरही भाष्य केलं आहे. जगातील अनेक देशांनी नागरिकांच्या मदतीसाठी घोषणा केल्या आहेत. या देशांमध्ये सरकारने जाहीर केलेला धनादेश दोन-तृतीयांश लोकांच्या हाती गेला आहे. मात्र, भारतामध्ये फक्त 10 टक्के लोकांना याचा फायदा झाला, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने लागू केलेली टाळेबंदी अपयशी ठरल्याचं म्हणत टीका केली होती. आता उद्योगपती राजीव बजाज यांनी त्यांचीच री ओढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT