Inflation due to corrupt policies Priyanka Gandhi criticizes BJP politics sakal
देश

Inflation : भ्रष्ट धोरणांमुळे महागाईचा भडका; प्रियांका गांधी

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींची भाजपवर टीका

सकाळ वृत्तसेवा

कनकगिरी : कर्नाटकातील भाजप सरकारच्या भ्रष्ट धोरणांमुळे महागाई गगनाला भिडली असून जीवनावश्यक वस्तू व सेवांच्या किमती वाढत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशनचे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या, की राज्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. घरगुती सिलिंडर, तांदूळ, डाळी आदींचे भाव खूप वाढले आहेत. भ्रष्ट सरकार भ्रष्ट धोरणे तयार करत असल्याने महागाईचा वणवा भडकला आहे. हे सरकार ४० टक्के कमिशनचा असल्याचा आरोप अन्य कुणी नाही तर ठेकेदारांची संघटनाच करत आहे. राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर लाच द्यावी लागत असल्याने ठेकेदार आत्महत्या करत आहेत, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी यावेळी केला.

भाजप आमदाराच्या मुलाच्या घरी आठ कोटींचे घबाड सापडल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांमुळे विचलीत न होता दैनंदिन समस्यांवर लक्ष्य केंद्रित करण्याचे आवाहनही प्रियांका गांधी यांनी यावेळी मतदारांना केले.

‘सरकारला लाज वाटत नाही का?’

प्रियांका गांधी यांनी यावेळी राज्यातील भरती गैरव्यवहाराचा मुद्दाही उपस्थित केला. त्या याबाबत बोलताना म्हणाल्या, की लोक आपल्या मुलांच्या शिक्षणावर तसेच त्यांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेण्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. मात्र, पोलिस उपनिरीक्षक भरतीमध्ये काही आमदारांनी पैसे चोरल्याने ही भरती प्रक्रियाच ठप्प झाली. सरकार अशा भरती प्रक्रियेमध्येच गैरव्यवहार करत आहे, याची सरकारला लाज वाटत नाही का, असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT