Supreme Court sakal
देश

Supreme Court : ‘माहिती आयोग वेगळी पीठे स्थापन करू शकतो’

‘केंद्रीय माहिती आयोगाला (सीआयसी) खंडपीठाची स्थापना करण्याबरोबरच नियम निश्चित करण्याचे देखील अधिकार आहेत,’ असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट करतानाच ‘या आयोगाला अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी स्वायत्तता मिळणे गरजेचे आहे’ असे नमूद केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘केंद्रीय माहिती आयोगाला (सीआयसी) खंडपीठाची स्थापना करण्याबरोबरच नियम निश्चित करण्याचे देखील अधिकार आहेत,’ असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट करतानाच ‘या आयोगाला अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी स्वायत्तता मिळणे गरजेचे आहे’ असे नमूद केले. न्या. विक्रम नाथ आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठाने हे निरीक्षण नोंदविले . प्रशासकीय संस्थांना निर्धारित करून दिलेले काम करण्यासाठी त्यांचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हे दोन्ही घटक महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कलम १२ (४) अंतर्गत या आयोगाला प्रसंगी वेगळ्या पीठाची देखील स्थापना करण्याचा अधिकार असल्याचे पीठाकडून सांगण्यात आले.

‘सीआयसी’ सारख्या संस्थांची विशिष्ट कामांच्या उद्देशांच्यापूर्तीसाठी स्थापना करण्यात आली असून या संस्थेमध्ये जर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला नाही तरच त्यांना अधिक निःपक्षपातीपणे काम करता येईल. या संस्थेकडे एका वेगळ्या पातळीवरचा निःपक्षपातीपणा आणि सखोलपणा असणे गरजेचे असते असेही न्यायालयाने नमूद केले. माहिती अधिकार कायद्यातून ‘सीआयसी’ला स्पष्टपणे नियम निश्चित करण्याचे अधिकार मिळालेले नाहीत पण याच माहिती अधिकार कायद्याच्या कलम १२ (४) अंतर्गत मात्र आयोगाला स्वतःचे काम अधिक व्यापकपणे करता यावे या उद्देशाने काही अधिकार बहाल करण्यात आले आहेत, असे न्यायालयाने या सुनावणीवेळी नमूद केले.

हायकोर्टाचा वेगळा निकाल

या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोग (व्यवस्थापन) नियम-२००७ हा मुख्य माहिती आयुक्तांनीच तयार केलेला नियम रद्दबातल ठरविला होता तसेच मुख्य माहिती आयुक्तांना वेगळे पीठ स्थापन करण्याचा अधिकार नसल्याचेही स्पष्ट केले होते. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. येथे सर्वोच्च न्यायालयाने मात्र या घटनात्मक संस्थांना अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांची स्वायत्तता कायम ठेवली जाणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT