देश

श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्या मृत्यूची चौकशी करा; कोलकाता हायकोर्टात याचिका

विनायक होगाडे

कोलकता : भारतीय जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका आज कोलकता उच्च न्यायालयात दाखल झाली. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू २३ जून १९५३ रोजी काश्‍मीरमध्ये तुरुंगात असताना झाला होता. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू नैसर्गिक होता काय, अशी विचारणा याचिकेत केली आहे. श्‍यामाप्रसाद मुखर्जी हे पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

परंतु त्यांनी काश्‍मीरच्या मुदद्यावरुन राजीनामा दिला आणि जनसंघाची स्थापना केली. जम्मू काश्‍मीरमध्ये परवानगी न घेता प्रवेश केल्याच्या कारणावरून काश्‍मीरच्या शेख अब्दुल्ला सरकारने श्‍यामाप्रसाद यांना अटक केली होती. मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर पंडित नेहरू यांनी श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आईंना सांत्वनपर पत्र लिहले, परंतु आईने केलेल्या चौकशीच्या मागणीवर नेहरूंनी मौन बाळगले. मुखर्जी यांचा मृत्युमागे कारस्थान असल्याचा आरोप अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत केला होता. मात्र केंद्रात वाजपेयी यांचे सरकार आल्यानंतर मुखर्जी यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले गेले नाहीत. एवढेच नाही तर नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ पासून सत्तेत असून या घटनेची चौकशी सुरू केली नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: हिंदू-मुस्लिम वादाशिवाय बोला: उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान; ..अन्यथा अजित पवारांची माफी मागा !

Spices Price Increase: स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! जिरे, धणे, मोहरी महागले; नवे दर काय? जाणून घ्या...

Bigg Boss Marathi 6 Live Update: घरात घुमणार अहिराणी आवाज? खान्देशी गायक करणार गेममध्ये एंट्री

Shubman Gill: विराटने वनडे, या सोप्या फॉरमॅटची निवड केली म्हणणाऱ्या मांजरेकरांना गिलचे उत्तर; म्हणाला, 'तसं असतं, तर भारताने...'

विवाहित प्रियकरासोबत तरुणीनं वंदे भारत ट्रेनसमोर घेतली उडी, छिन्नविछिन्नावस्थेत आढळले मृतदेह; एकाच कंपनीत करायचे काम

SCROLL FOR NEXT